इंडिगोच्या ई- मेल सेवेला Microsoft बिघाडाचा फटका! Outlook – Teams वापरणाऱ्यांचा

मायक्रोसॉफ्टच्या सेवा बंद पडल्यामुळे जगभरातील यूजर्सना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. outlook, microsoft teams copilot यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. इंडिगोच्या ई- मेल सेवेलाही याचा फटका बसला आहे. मायक्रोसॉफ्टने स्वत: याबाबत अपडेट देत दिली आहे.

इंडिगोच्या ई- मेल सेवेला Microsoft बिघाडाचा फटका! Outlook - Teams वापरणाऱ्यांचा
MICROSOT INDIGO EFFECTS
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 12:59 PM

मायक्रोसॉफ्टच्या सेवा बंद पडल्यामुळे जगभरातील यूजर्सना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. outlook, microsoft teams copilot यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर कंपनीने त्या पूर्ववत करण्यासाठी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आता या प्रयत्नांनाही यश मिळत नाही आहे. मायक्रोसॉफ्टने स्वत: याबाबत अपडेट देत दिली आहे.

12 नोव्हेंबरपासून मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाला आहे. मायक्रोसॉफ्टने 13 ऑक्टोबर रोजी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या सेवांच्या स्थितीबाबत माहिती दिली. मात्र कोणतीही सुधारणा झाली नसल्याने कंपनी आता पर्यायी उपाय शोधत आहे. नेटवर्कवरील वाहतुकीचं असंतुलन दूर करून यंत्रणेची क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे.

Loading...

कंपनीच्या म्हणण्यांनुसार काही भागांतील सर्व्हर अचानक बंद पडल्यामुळे उर्वरित यंत्रणेवर अतिरिक्त भार पडला. त्यामुळे सेवा वापरताना अडचणी निर्माण झाल्या. हा वाढलेला भार केवळ यूजर्सची संख्या वाढल्यामुळे निर्माण झालेला नसल्यांचही मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलं आहे.

Outlook, Teams आणि Copilot वर परिणाम

या बिघाडाचा परिणाम मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांवर झाला आहे. यूजर्सना या आउटलूकमध्ये ई-मेल उघडणे, मेल पाठवणे किंवा रिसिव्ह करणे आणि इनबॉक्स लोड करण्यात अडचणी येत आहेत. Teams, Microsoft ai, assistant copilot च्या काही सुविधेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगभरातून जवळपास 1 लाख 30 हजार लोकांनी याबद्दल तक्रारी नोंदवल्या आहेत.

भारतातील इंडिगोच्या ई-मेल सेवेलाही फटका

या जागतिक तांत्रिक बिघाडाचा परिणाम भारतातील इंडिगो विमान कंपनीच्या ई- मेल सहाय्य सेवांवरही झाल आहे. कंपनीने याबाबत सूचना जारी केली. मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये अडथळा असल्यामुळे ई- मेलव्दारे पाठवलेले संदेश मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. असं इंडिगोने सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us