
नवी दिल्ली : मोठ्या महानगरासोबत निन्म शहरातही ओला (Ola) कॅब सर्व्हिस आता हमखास उपलब्ध असते. तुम्हीही ओला कॅबने सफर केली असणार. अनेकांप्रमाणेच तुम्हालाही ऐनवेळी कॅन्सल होणाऱ्या राईडचा अनुभव आला असेल. तुम्ही कॅब बुक करता. तुम्हाला ड्रायव्हरचा फोन येतो. तुम्हाला लोकेशन व पेमेंट मोड बद्दल विचारले जाते. तुम्ही कॅबच्या प्रतीक्षेत असतात. अन् क्षणार्धात तुमच्या मोबाईलवर राईड कॅन्सलचा मेसेज येऊन धडकतो. तुमचे पुन्हा नवी राईड, नवी ड्रायव्हर चक्र सुरू होते.
प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी मार्ग काढला आहे. ऐनवेळी होणाऱ्या कॅब राईडच्या कॅन्सलपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. आपल्या ट्विटरवर त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
‘ओला’चे सीईओ भावेश अग्रवाल यांनी हटके अंदाजात ट्विटरवर उत्तर दिले आहे. “मला वारंवार विचारल्या जाणाऱ्या दुसऱ्या लोकप्रिय प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे. माझा ड्रायव्हर ओला राईड रद्द का करतो? आम्ही या त्रुटीवर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत. आता ओला ड्रायव्हर राईड स्विकारण्यापूर्वी तुमचे लोकेशन आणि पेमेंट मोड तपासेल. कॅन्सलेशन कमी करण्यासाठी ड्रायव्हरला ही माहिती नक्कीच कळवा”
राईड कॅन्सल करण्याचे महत्वाचे कारण लोकेशन मानले जाते. पेमेंट मोड बद्दलही असमर्थताही व्यक्त केली जाते. ड्रायव्हरने डिजिटल ऐवजी कॅश पेमेंटचा आग्रह धरतात. त्यामुळे देखील राईड कॅन्सल केली जाते.
ओला कंपनीने या समस्येवर मार्ग काढला आहे. तुम्ही ओला प्लॅटफॉर्मवर कॅब बुक करतानाच तुमचे लोकेशन व पेमेंट मोडची माहिती घेतली जाईल. तुमचे लोकेशन आणि पेमेंट मोडची माहिती तुमच्या नजीक असणाऱ्या कॅब ड्रायव्हरना प्राप्त होईल. तुमचे लोकेशन आणि पेमेंट मोड याबद्दल अनुकूल असणारा कॅब ड्रायव्हरद्वारेच तुमची राईड स्विकार केली जाईल. त्यामुळे राईड कॅन्सल करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
राईड कॅन्सल होण्यासाठी दोनच कारणे कारणीभूत नाहीत. शिफ्ट संपणे, पर्याप्त CNG नसणे यांसारख्या अनेक कारणांचा समावेश होतो. मात्र, कंपनीद्वारे याविषयीचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. मात्र, अशाप्रकारची पावले ओलाने उचलली आहेत. उबरने अद्याप याबद्दल कोणत्याही स्वरुपाची प्रतिक्रिया दिलेली नाही.
इतर बातम्या
डिजिटल शिधापत्रिका: तुमचं नावं ते रेशन तपशील, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Smartwatch : स्मार्टवॉच घेताय? बोटनं लॉन्च केलं नवं प्रॉडक्ट, किंमत पाच हजार रुपयांपेक्षाही कमी!