AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OPPO चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, अवघ्या साडे 12 हजारात धमाकेदार फिचर्स मिळणार

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने (OPPO) शुक्रवारी त्यांच्या ए-सिरीजमधील स्मार्टफोन ओप्पो ए 15 (OPPO A15) मधील नवीन स्टोरेज वेरिएंट लाँच केलं आहे.

OPPO चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, अवघ्या साडे 12 हजारात धमाकेदार फिचर्स मिळणार
| Updated on: Feb 06, 2021 | 4:25 PM
Share

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने (OPPO) शुक्रवारी त्यांच्या ए-सिरीजमधील स्मार्टफोन ओप्पो ए 15 (OPPO A15) मधील नवीन स्टोरेज वेरिएंट लाँच केलं आहे. पूर्वी हे मॉडल 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज या कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध होतं. आता हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 12,490 रुपए इतकी ठेवण्यात आली आहे. (OPPO A15 launch in Indian market at 12490 rupees)

या फोनमध्ये 6.52 इंचाचा वॉटरड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात टियरड्रॉप नॉच आहे. या फोनचं स्क्रीन रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. या फोनमध्ये 4230mAh बॅटरी दिली आहे. तसेच 10 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा कॅमेरा तसेच 2-2 मेगापिक्सलचे डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ओप्पो ए15 दोन वायब्रेंट कलरमध्ये (डायनॅमिक ब्लॅक आणि फॅन्सी व्हाइट उपलब्ध आहे. तसेच हा फोन रिटेल स्टोर्स आणि अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन Samsung च्या गॅलेक्सी M सिरीजमधील दुसरा मोबाईल आहे, त्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy M02 असं ठेवलं आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Samsung-Galaxy-M02

या डुअल नॅनो सिमवाल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इनफिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे जो MediaTek SoC प्रोसेसरसह येतो. कंपनीने Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा आणि 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

जबरदस्त कॅमेरा

सोबतच या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन कंपनीने ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या कलर ऑप्शन्ससह सादर केला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड One UI वर चालतो. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 10W च्या स्टँडर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कनेक्टिविटीसाटी गॅलेक्सी M02 मध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लुटूथ, GPS/ A-GPS आणि USB Type-C port देण्यात आला आहे.

हेही वाचा

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

(OPPO A15 launch in Indian market at 12490 rupees)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.