6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

काही दिवसांपूर्वी Poco कंपनीने या स्मार्टफोनचा एक टीझर लाँच केला होता. ज्यामध्ये या स्मार्टफोनला रियल किलर म्हटलं होतं.

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त...

मुंबई : POCO India कंपनीने आज भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं नाव POCO M3 असं आहे. कंपनीने एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन आता एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि येल्लो या कलर ऑप्शन्ससह लाँच केला आहे. (POCO M3 smartphone launched in india check price and specification)

काही दिवसांपूर्वी कंपनीने या स्मार्टफोनचा एक टीझर लाँच केला होता. ज्यामध्ये या स्मार्टफोनला रियल किलर म्हटलं होतं. या फोनचा टीझर पाहिल्यानंतर युजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत खूप क्रेझ निर्माण झाली होती. कंपनीने POCO M3 हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच केला होता. तेव्हापासून या फोनबाबत भारतीय युजर्समध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर आज हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे.

कंपनीने POCO M3 स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स सादर केले आहेत. ज्यामध्ये 6GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662G प्रोसेसरवर चालतो. फ्लिपकार्टवर 9 फेब्रुवारीपासून या फोनचा पहिला सेल सुरु होईल.

Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह सादर करण्यात आला आहे. पोको एम 3 स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉयड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित आहे. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन करण्यात आलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्‍यासह सादर करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (रियर कॅमेरा) देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेंसर सपोर्ट आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सला कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा

108MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह येणाऱ्या Mi 10 स्मार्टफोनच्या किंमतीत 5000 रुपयांची कपात

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

(POCO M3 smartphone launched in india check price and specification)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI