108MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह येणाऱ्या Mi 10 स्मार्टफोनच्या किंमतीत 5000 रुपयांची कपात

अक्षय चोरगे

|

Updated on: Feb 02, 2021 | 2:42 PM

शाओमीने (Xiaomi) 2020 मध्ये लाँच केलेल्या फ्लॅगशिप Mi 10 स्मार्टफोनची किंमत 5 हजार रुपयांनी कमी केली आहे.

108MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह येणाऱ्या Mi 10 स्मार्टफोनच्या किंमतीत 5000 रुपयांची कपात
Follow us

मुंबई : शाओमीने (Xiaomi) 2020 मध्ये लाँच केलेल्या फ्लॅगशिप Mi 10 स्मार्टफोनची किंमत 5 हजार रुपयांनी कमी केली आहे. शाओमीचा हा असा पहिला स्मार्टफोन आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेरासोबत लाँच करण्यात आला होता. या फोनमध्ये 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनची किंमत 49,999 रुपये होती तर याच स्मार्टफोनच्या 256 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या वेरियंटची किंमत 54,999 रुपये इतकी होती. हे दोन्ही मॉडल्स 8 जीबी रॅमसह लाँच करण्यात आले आहेत. (Xiaomi Mi 10 is now 5000 rupees cheaper in India)

दरम्यान, कंपनीने दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत 5000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही जर याच स्मार्टफोनचं 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेलं वेरियंट खरेदी करत असाल तर तुम्ही हा फोन 44,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तर या फोनचं 256 जीबी स्टोरेज स्पेस असलेलेलं वेरियंट 49,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. दोन्ही स्मार्टफोन्सच्या नव्या किंमती शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या आहेत.

Mi 10 या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचांचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1080×2340 पिक्सल रेजॉल्यूशनसह येतो. याच्या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 8 जीबी रॅमसह येतो. हा स्मार्टफोन 5G आहे जो MIUI 12 वर काम करतो. तसेच हा फोन डुअल सिम कार्ड्सना सपोर्ट करतो.

हा फोन क्वाड रियर डिजिकॅम सेटअपसह येतो ज्यामध्ये तुम्हाला 108MP कॅमेरा सेन्सर मिळेल. तसेच यामध्ये 13MP ची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे. तसेच या फोनमध्ये 4780 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W च्या वायर्ड चार्जिंग आणि 10W च्या रिवर्स चार्जिंगसह येते.

4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…

नववर्षाच्या सुरुवातीला शाओमी (Xiaomi) या कंपनीने नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. शाओमी या कंपनीने भारतात Mi 10i हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Mi 10 या स्मार्टफोन सीरिजमधील हा चौथा फोन आहे. 8 जानेवारीपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु करण्यात आली आहे. Xiaomi ने Mi 10i स्मार्टफोनचे तीन वेरिएंट लाँच केले आहेत. यातील 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB असे तीन वेरिएंट उपलब्ध आहेत.

Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार 999 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला 6GB+64GB स्टोरेजचा फोन खरेदी करता येऊ शकतो. 6GB+128GB स्टोरेजच्या फोनची किंमत ही 21 हजार 999 रुपये आहे. 8GB+128GB वेरिएंटचा फोन हा 23 हजार 999 रुपये इतका आहे. Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची विक्री ही अमेझॉन इंडिया आणि mi.com वर 8 जानेवारीपासून सुरु आहे.

Mi 10i हा नवा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे. यात Pacific Sunrise, Midnight Black, Atlantic Blue या तीन रंगांचा समावेश आहे. शाओमीचा Mi 10i हा स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.67 इंच फुल HD+ आहे. या फोनच्या सुरक्षितेसाठी याला पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी Corning Gorilla Glass देण्यात आली आहे. हा फोन IP53 रेटींगसोबत येत असल्याने त्याला धुळीपासून कोणतेही नुकसान होणार नाही.

हेही वाचा

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!

(Xiaomi Mi 10 is now 5000 rupees cheaper in India)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI