स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका, या तारखेपासून महागणार हे फोन

तुम्ही जर स्मार्टफोन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर काही मोबाईल फोन्सच्या किंमतीत वाढ होणार आहे.मोबाईल्सच्या पार्ट्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि पुरवठा साखळीत झालेल्या अडचणींमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका, या तारखेपासून महागणार हे फोन
Smartphone
| Updated on: Mar 10, 2026 | 10:16 PM

स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. चीनच्या दोन मोठ्या कंपन्या OPPO आणि OnePlus लवकरच आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्याच्या बेतात आहे. बातमीनुसार या दोन कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनची किंमत १६ मार्च पासून वाढवण्याच्या तयारीत आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की कंपनीने हा निर्णय वाढत्या कंपोनंट किंमती आणि सप्लाय चेनमध्ये आलेल्या अडचणींमुळे घेतला आहे. म्हणजे येत्या काही दिवसात OPPO आणि OnePlus चे फोन घेण्याच्या विचारात असाल तर जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

बातमीनुसार OPPO आणि OnePlus यांनी संयुक्त पत्रक काढत १६ मार्च पासून काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत बदल केला जाऊ शकतो. हा बदल अनेक बाजारात लागू होणार असून त्यात भारताचा देखील समावेश आहे. मात्र, कंपनीने हे स्पष्ट केलेले नाही की मोबाईल फोनच्या कोणत्या मॉडेलचे दर वाढणार आहेत. इंडस्ट्री ट्रेंड्स पाहा पाहाता असा अंदाज लावला जात आहे की किंमतीत १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

वनप्लसचे फोन ५० हजाराच्या पुढे जाऊ शकतात –

रिपोर्ट्सच्या मते OnePlus च्या काही फोन्सच्या किंमतीवर याचा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ OnePlus 15R ला भारतात ४७,९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत बाजारात उतरवले होते. परंतू याच्या किंमत आता ५० हजार रुपयांच्या वर जाऊ शकते.

याच प्रकारे ओप्पोच्या ए सिरिज आणि के सिरीजचे स्मार्टफोन्स देखील महाग होऊ शकतात.

का वाढत आहेत स्रार्टफोनचे दर –

स्मार्टफोन इंडस्ट्रीत काही दिवसांआधी कंपोनंटचे किंमती वेगाने वाढल्या आहेत. खासकरुन RAM, चिपसेट आणि अन्य हार्डवेअर पोर्टस महाग झाले आहेत. याच कारणामुळे कंपनीने त्याच्या फोनची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुरवठा साखळीतील अडचणी आणि नव्या तंत्रज्ञानामुळे मॅन्युफॅक्चरिंगचा खर्चात वाढ झाली आहे.

ग्राहकांना मोठा फटका –

ही दरवाढ जर लागू झाली तर याचा मोठा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. खास करुन मिड-रेंज आणि प्रिमीयम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये फोनच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. तुम्ही जर ओप्पो आणि वनप्लस फोनची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १६ मार्च आधी फोनची खरेदी करावी. कारण त्यानंतर किंमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला फटका बसू शकतो.

Follow Us