
नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने आपला गॅलेक्सी A17 5G हा स्मार्टफोन युरोपियन बाजारात लाँच केला आहे. त्यानंतर आता हा बजेट स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण कंपनीने या फोनचे सपोर्ट पेज लाईव्ह केले आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 5nm तंत्रज्ञानासह Exynos 1330 चिपसेट मिळेल. या फोनची संभाव्य किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
भारतीय टिपस्टर अभिषेक यादव यांनी या फोनची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानुसार या फोनची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये असण्याची शक्यता आहे. हा फोन युरोपियन बाजारात 4GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनची रॅम आणि स्टोरेज वाढवता येते. तसेच हा फोन निळ्या, काळ्या आणि राखाडी रंगांमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
सॅमसंग कंपनीने युरोपमध्ये हा फोन 6.7-इंचाचा FHD + Infinity U सुपर AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे. याचे रिझोल्यूशन 1080 x 2340 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करतो. या फोनला पाणी आणि धूळ संरक्षणासाठी IP54 रेटिंग देण्यात आलेली आहे.
Samsung Galaxy A17 5G या फोनमध्ये Exynos 1330 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हाफोन 8GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Android 16 वर काम करतो.
Samsung Galaxy A17 5G मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, जो पॉवर बटणासह इंटिग्रेटेड आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 मेगापिक्सेलचा मेन आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी मॅक्रो कॅमेरा आहे. तसेत फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5 जी/4 जी नेटवर्क, ब्लूटूथ 5.3, वाय-फाय हे फीचर्स देण्यात आलेले आहेत.