लाँचिंगआधीच Samsung Galaxy A22 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 01, 2021 | 11:11 PM

सॅमसंग (Samsung) कंपनी 4 जी आणि 5 जी या दोन्ही एडिशनमध्ये गॅलेक्सी ए 22 (Galaxy A22) लाँच करुन आपल्या गॅलेक्सी ए सिरिजचा विस्तार करण्याच्या विचारात आहे.

लाँचिंगआधीच Samsung Galaxy A22 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?
Samsung Galaxy A22

मुंबई : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) 4 जी आणि 5 जी या दोन्ही एडिशनमध्ये गॅलेक्सी ए 22 (Galaxy A22) लाँच करुन आपल्या गॅलेक्सी ए सिरिजचा विस्तार करण्याच्या विचारात आहे. जीएसएम अरेनाच्या अहवालानुसार, अलीकडेच भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) वेबसाइटवर SM-A225F हा स्मार्टफोन पाहावयास मिळाला आहे. (Samsung Galaxy A22 smartphone price and features leaked)

अहवालात असे म्हटले आहे की, SM-A225F/DS फोनमध्ये ड्युअल-सिम स्पोर्ट असेल. याशिवाय या अहवालात A22 4G बाबतची इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच SM-A225F मॉडल नंबर HTML5 टेस्ट लिस्टिंगमध्येदेखील पाहायला मिळाला आहे. हा फोन Android 11 आऊट ऑफ द बॉक्सवर चालेल.

किंमत

अनेक लीक्सच्या माध्यमातून सॅमसंग गॅलेक्सी A22 चे स्पेसिफिकेशन्स आणि त्याची किंमत समोर आली आहे. परंतु कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची किंमत निश्चित केलेली नाही, असेदेखील सांगण्यात आले आहे. Samsung Galaxy A22 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 18,499 रुपये मोजावे लागतील, असा दावा काही लीक्समध्ये करण्यात आला आहे.

फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी A22 हेलिओ जी 80 SoC सपोर्टेड फोन असेल. यात 6.4 इंचाची एचडी + सुपर एमोलेड स्क्रीन असून त्याचा रीफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. GSM अरेनाच्या अहवालानुसार या फोनमध्ये 15 व्होल्ट चार्जिंगसह 5,000 mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. याशिवाय बायोमेट्रिक्ससाठी फोनमध्ये साइड-माऊंट फिंगरप्रिंट रीडरसुद्धा देण्यात आला आहे.

दमदार कॅमेरा

असे म्हटले जात आहे की, सॅमसंग कंपनी इतर मेमरी कॉन्फिगरेशन हा फोन भारतात लाँच करणार नाही आणि कदाचित हा फोन चारऐवजी केवळ दोन रंगांच्या ऑप्सन्ससह सादर केला जाईल. फोटोग्राफीसाठी, गॅलेक्सी ए A22 4जीमध्ये एकूण पाच कॅमेरे आहेत, त्यापैकी एक 13MP चा सेल्फी कॅमेरा असेल. तर आयओएससह 48 एमपी प्राइमरी कॅमेरा, एक 8 एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर दिला जाईल.

अलीकडेच सॅमसंगने भारतात गॅलेक्सी A52, A52 5G आणि A72 सादर केले आहेत. याबरोबरच कंपनीने असेही म्हटले आहे की, या डिव्हाईसेसमध्ये कमीत कमी किंमतीत उत्तम तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल. नवीन Galaxy A Series सुपर AMOLED डिस्प्लेसह ऑसम व्हॉयलेट, ऑसम ब्लू, ऑसम ब्लॅक आणि ऑसम व्हाईट या कलर ऑप्शन्ससह जागतिक स्तरावर लाँच होईल. Galaxy A52 आणि A72 लवकरच भारतात लाँच केले जातील.

इतर बातम्या

WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अ‍ॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!

PUBG Mobile मध्ये Tesla च्या गाड्या दिसणार, कंपनीकडून मोठ्या भागीदारीची घोषणा

(Samsung Galaxy A22 smartphone price and features leaked)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI