तुमचाही Smart TV गपचूप ऐकतोय बोलणं ? लगेच ऑन करा ही सेंटिग्स

घरात असलेला स्मार्ट टीव्ही देखील गपचुप तुमचं बोलणं ऐकू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? जर तुम्ही देखील स्मार्ट टीव्ही वापरत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यखा तुमचं बोलणं ऑनलाइन लीक होऊ शकतं.

तुमचाही Smart TV गपचूप ऐकतोय बोलणं ? लगेच ऑन करा ही सेंटिग्स
| Updated on: Oct 19, 2026 | 6:10 PM

आजकाल बहुंताश घरात Smart TV असतो. नव्या टेक्नॉलॉजीचा बरेच जण वापरत करतात ना. पण हाच Smart TV तुमचं बोलणं गपचूप ऐकू शकतो. घरातल्या हॉलमध्ये किंवा तुमच्या बेडरूममध्ये असलेला टीव्ही तुमचं प्रायव्हेट बोलणं रेकॉर्डही करू शकतो. घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक स्मार्ट डिव्हाइस प्रमाणे, यातूनही डेटा लीक होण्याचा धोका अशतो. अशा परिस्थितकीक प्रत्येक स्मार्ट डिव्हाईसप्रमाणेच Smart TV वापरतानाही काही गोष्टींची काळजी घेणं आव्श्यक असतं, नाहीतर तुमच्या खासगी गोष्टी व्हायरल होऊ शकतात.

का आहे रिस्क ?

Loading...

आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश स्मार्ट टीव्हींमध्ये मायक्रोफोन असतात. व्हॉइस कमांडच्या मदतीने टीव्हीवरील ॲप्स नियंत्रित करण्यासाठी या मायक्रोफोनचा वापर केला जातो. मात्र, याच सोयी-सुविधेमुळे तुमच्या बेडरूममधील संभाषण किंवा खासगी गोष्टी रेकॉर्ड होण्याची भीती असते. अशा प्रकारची माहिती रेकॉर्ड होऊन सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास मोठं नुकसान होऊ शकतं.

तुम्हालही कधीतरी असा अनुभव आला असेल किंवा असं पाहिलं असेल की, स्मार्ट टीव्हीवर जे चित्रपट, शो किंवा कार्यक्रम पाहतो, त्यांची माहिती टीव्हीमध्ये साठवली जाते. टीव्हीची ऑपरेटिंग सिस्टिम या माहितीच्या आधारे तुमच्या आवडीनुसार चित्रपट आणि शो सुचवते. काही वेळा तुम्ही एखाद्या चित्रपटाबद्दल किंवा शोबद्दल चर्चा करता आणि त्याच्याशी संबंधित सूचना टीव्हीवर दिसू लागतात. मात्र, असं प्रत्येक वेळी मायक्रोफोनमुळेच घडतं असं नाही. तुम्ही मायक्रोफोनला परवानगी दिली असल्यास काही ॲप्सना तुमचा आवाज ऐकण्याची किंवा त्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा मिळू शकते. टीव्हीमध्ये इन्स्टॉल केलेल्या ॲप्सना त्यांच्या परवानग्यांनुसार मायक्रोफोन, स्टोरेज, आयपी अ‍ॅड्रेस आणि लोकेशन यांसारख्या माहितीचा ॲक्सेस मिळू शकतो.

कंपन्यांसोबत शेअर होतो डेटा

स्मार्ट टीव्हीची जी ऑपरेटिंग सिस्टिम असते, ती तुमच्या आवडी-निवडींशी संबंधित माहिती जाहिरात आणि विश्लेषण करणाऱ्या कंपन्यांसोबत शेअर करू शकते. त्यामुळे स्मार्ट टीव्हीसमोर खासगी संभाषण करत असाल तर प्रायव्हसी तर हवीच पण सतर्क राहणंही आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट टीव्हीमधील ACR (Automatic Content Recognition) या तंत्रज्ञानामुळे गोपनीयतेशी संबंधित प्रश्न निर्माण होऊ शकतात. ही टेक्नॉलॉजी टीव्हीवर सुरू असलेला कंटेंट ओळखण्यासाठी त्याचं विश्लेषण करते. यामुळे तुम्ही कोणते कार्यक्रम किंवा चित्रपट पाहता, यासंबंधीची माहिती गोळा केली जाऊ शकते.

गुगल, सॅमसंग आणि एलजी यांसारख्या स्मार्ट टीव्ही उत्पादक कंपन्या ACR तंत्रज्ञानाचा वापर प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार टीव्ही शो, वेब सीरिज आणि इतर कंटेंट सुचवण्यासाठी करत असल्याचं सांगतात. याशिवाय, या तंत्रज्ञानाद्वारे गोळा केलेल्या माहितीचा वापर जाहिराती दाखवण्यासाठीही केला जाऊ शकतो. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही वापरत असाल तर गोपनीयता सेटिंग्ज तपासणं आणि अनावश्यक परवानग्या बंद ठेवणं महत्त्वाचे आहे.

काय करावं ?

– जे स्मार्ट डिव्हाइस रोज वापरतो, त्याच्या प्रायव्हसीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. स्मार्ट टीव्हीमधील व्हॉइस कंट्रोल आणि व्हॉइस असिस्टंटची सुविधा वापरत नसल्यास सेटिंग्जमध्ये जाऊन ते बंद करावं.

– त्याचप्रमाणे, ACR (ऑटोमॅटिक कंटेंट रिकग्निशन) आणि वैयक्तिक आवडीनिवडींनुसार सूचना देणारी फीचर्सही बंद ठेवावीत. टीव्हीचा वापर नसताना तो बंद करावा आणि गरज नसेल तर वाय-फाय कनेक्शनही डिस्कनेक्ट करावं

– काही स्मार्ट टीव्हींमध्ये इन-बिल्ट कॅमेरा असतो. गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी हा कॅमेरा बंद ठेवावा. तसेच, आवश्यकता नसेल तर कोणत्याही ॲपला मायक्रोफोनचा ॲक्सेस देऊ नका. टीव्हीमधील वैयक्तिक माहिती आणि डेटा सुरक्षित राहावा, यासाठी सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us