महिलांनो घाबरू नका, तुमच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील 5 अ‍ॅप

महिलांवर कुठलाही अतिप्रसंग आला तर महिलेच्या हातात असं शस्त्र हवं ज्याने त्या नराधमांना सडेतोड उत्तर देतील. त्यामुळे मोबाईलमध्ये असे काही अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत ज्याने महिलांना सुरक्षेसाठी मदत करता येईल.

महिलांनो घाबरू नका, तुमच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील 5 अ‍ॅप
व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 02, 2020 | 4:52 PM

मुंबई : देशात महिला सुरक्षा हा सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पेटून उठला आहे. रोज म्हटलं तरी महिला अत्याचाराच्या आणि लैंगिक छळाच्या घटना देशात समोर येत आहेत. कुठल्याही क्षेत्रात महिला सुरक्षित नाही हे वेळीवेळी समोर आलं आहे. महिला अत्याचाराची एखादी घटना समोर आली की, ज्यावर जातीचं राजकारण, कँडल मार्च आणि न्यायासाठी आंदोलन झाल्याचं पाहिलं. पण यातून अत्याचार थांबतील का? हा खरा प्रश्न आहे. (security of women top 5 apps for women safety )

महिला अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या देशातील महिलांना शारिरीकदृष्ट्या सक्षम करणं महत्त्वाचं आहे. त्यांना लहानपणापासून शारिरीक व्यायाम, कराटेसारख्या शैली अवगत असल्या पाहिजे. यासाठी महिलांना शालेय शिक्षणातच या सगळ्याचे धडे देणं महत्त्वाचं आहे. पण यावर राजकारणापलीकडे कोणतीही ठोस पाऊलं उचललं गेलं नाही. पण अशात ऑनलाईनच्या विश्वात महिला सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे आणि उपयोगी अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत.

महिलांवर कुठलाही अतिप्रसंग आला तर महिलेच्या हातात असं शस्त्र हवं ज्याने त्या नराधमांना सडेतोड उत्तर देतील. त्यामुळे मोबाईलमध्ये असे काही अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत ज्याने महिलांना सुरक्षेसाठी मदत करता येईल. जाणून घेऊयात कोणते आहेत हे महत्त्वाचे अ‍ॅप…

सफेटिपिन अ‍ॅप (Safetypin App) हा अ‍ॅप खास महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून GPS ट्रॅकिंग, इर्मजन्सी फोन नंबर आणि सुरक्षित लोकेशन असे फिचर्स देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त यूजर्स अ‍ॅपमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित जागांची माहिती मिळवू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेचा समावेश आहे. (security of women top 5 apps for women safety )

हिंमत प्लस अ‍ॅप (Himmat Plus App) दिल्ली पोलिसांनी हा अ‍ॅप खास महिलांसाठी तयार केला आहे. या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी यूजर्सला सगळ्यात आधी दिल्ली पोलिसांच्या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. यानंतर वापरकर्त्यांना यामध्ये एसओएस बटनाची सुविधा उपलब्ध होते. ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत यूजर लोकेशन, ऑडिओ आणि व्हिडिओ थेट पोलीस कंट्रोल रूमला पाठवू शकतो.

वूमन सेफ्टी अ‍ॅप (Women Safety App) या अ‍ॅपचं खास वैशिष्ट्य म्हणजे यूजरच्या आवाजाचा 45 सेकंदाचा मेसेज, व्हिडिओ आणि लोकशन आपत्कालीन नंबरवर पाठवला जाऊ शकतो. ज्याने तात्काळ मदत पोहोचवण्यास शक्य होतं.

बीसेफ अ‍ॅप (Bsafe App) या अ‍ॅपचा वापर तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी करू शकता. यामध्ये तुम्हाला एसओएस आणि लोकेशन शेअरिंगसारखे फिचर मिळतील. ज्याचा उपयोग तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये करणं शक्य होईल.

शेक टू सेफ्टी अ‍ॅप (Shake To Safety App) महिलांच्या सुरक्षेसाठी हा अ‍ॅप अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये कुठलाही महत्त्वाचा मेसेज पाठवण्यासाठी फक्त फोनला हलवून किंवा पॉवर बटनला चार वेळा दाबून आधीच ठरवल्या गेलेल्या नंबरवर पाठवला जाऊ शकतो. फक्त फोनला हलवूनदेखील महत्त्वाचा मेसेज पाठवला जाऊ शकतो हेच या अ‍ॅपचं खास वैशिष्ट्य आहे.

इतर बातम्या – 

चाकूच्या धाकावर मुंबईत विवाहितेवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून मित्रांमध्ये व्हायरल

धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल

(security of women top 5 apps for women safety )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें