मुलाला चांगले मार्क्स मिळाले, तर रिपोर्ट कार्डमध्ये स्तुतीऐवजी शिक्षकांनी लिहिलं असं, वाचून तुम्हाला धक्का बसेल

एक मार्कलिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे, त्यावर त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याऐवजी शिक्षकाने असं काही भयानक लिहिलं आहे की, त्यावर भयानक कमेंट आल्या आहेत.

मुलाला चांगले मार्क्स मिळाले, तर रिपोर्ट कार्डमध्ये स्तुतीऐवजी शिक्षकांनी लिहिलं असं, वाचून तुम्हाला धक्का बसेल
report card
Image Credit source: facebook
| Updated on: Mar 30, 2023 | 8:42 AM

मुंबई : तुमच्या वार्षिक निकालावरती (report card) प्रत्येक शिक्षक टिप्पणी करीत असतात. विद्यार्थ्यांचे आई-वडील या गोष्टी जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक असतात. परंतु एका शिक्षकाची चुकी सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. शिक्षकाने (Teacher) केलेली टिप्पणी सध्या सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. सध्या जी मार्कलिस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. ती २०१९ ची आहे. ‘ती मेली आहे’ असं लिहिलं आहे, परंतु त्या शिक्षिकेला पास झाली असं लिहायचं आहे. परंतु चुकीमुळे त्यांनी पास्ड अवे (Passed Away) लिहिलं आहे. ज्या विद्यार्थ्याची मार्कलिस्ट व्हायरल झाली आहे. त्या विद्यार्थ्याने सातवा क्रमांक काढला आहे. तो फोटो अनंत भान यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणला आहे. आतापर्यंत ते ट्विट तीन हजार लोकांनी पाहिलं आहे.

एका नेटकऱ्याने चांगली सुचना केली आहे

एका नेटकऱ्याने सांगितले की, त्याने हा फोटो फेसबुकवरून घेतला आहे. विद्यार्थ्याने जिथं शिक्षण घेतले, त्या देशाचा उल्लेख केला नाही. पण रिपोर्ट कार्डवर सूचीबद्ध केलेल्या विषयांपैकी एक चिचेवा हा विषय आहे. चिवेचा ही आफ्रिकेतील मलावीची अधिकृत भाषा आहे. इतर विषय म्हणजे गणित, इंग्रजी, कृषी, बीके/आरई, सामाजिक, जीवन कौशल्ये आणि कला असे आहेत.

सोशल मीडियावर अनेकांची नाराजी

शिक्षकाने केलेल्या कमेंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. एका नेटकऱ्याने असं सांगितलं की, लिहिताना चुकी झाली असं म्हटलं आहे, तर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे ट्विट अजून व्हायरल होण्याची शक्यता आहे.