अनोखं स्मार्ट वीज मीटर, रिचार्जपासून ऑन-ऑफपर्यंत सर्वकाही मोबाईलवर

| Updated on: Jan 04, 2021 | 9:21 PM

आता नव्या वर्षात वीज बिलाच्या क्षेत्रात मोठा बदल होत आहे. बिहारमध्ये अनोखं स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येत आहे.

अनोखं स्मार्ट वीज मीटर, रिचार्जपासून ऑन-ऑफपर्यंत सर्वकाही मोबाईलवर
Follow us on

पाटणा : अनेकदा वीज बिलाबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी असतात. एकतर वीज बिल वेळेवर येत नाही किंवा आलं तरी त्यात अव्वाच्या सव्वा बिल आलेलं असतं. लॉकडाऊनच्या काळात तर अशा अधिकच्या बिलांनी सर्वसामान्यांना चांगलाच घाम फोडला. मात्र, आता नव्या वर्षात वीज बिलाच्या क्षेत्रात मोठा बदल होत आहे. बिहारमध्ये अनोखं स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येत आहे. या मीटरमुळे ग्राहकांना लाईट बंद करण्यापासून रिचार्ज करण्यापर्यंतच्या सुविधा मोबाईलवर देण्यात आल्या आहेत (Smart prepaid Electricity meter controlled by mobile in Bihar).

विशेष म्हणजे हे बिल मोबाईल सीमकार्ड सारखंच काम करेल. ग्राहकांना वीज वापरासाठी आधी मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज संपला की संबंधित घरातील वीज आपोआप बंद होईल. यामुळे वीजेच्या चोरीवर आळा बसेल आणि ग्राहकांच्या वीज बिलांच्या तक्रारी देखील संपतील, अशी आशा वीज महामंडळाला आहे. सध्यातरी ही सुविधा केवळ बिहारमध्ये सुरु होत आहे. बिहारच्या वीज विभागाने नव्या वर्षात हे स्मार्ट प्रीपेट मीटर (Prepaid Electricity Meter in Bihar) बसवण्यास सुरुवात केलीय. एप्रिल 2021 पर्यंत संपूर्ण बिहारमध्ये हे प्रीपेड मीटर बसवण्याचं नियोजित आहे.

बिहार स्मार्ट प्रीपेड मीटर बिल देणारं देशातील पहिलं राज्य

बिहार स्मार्ट प्रीपेड मीटर बिल देणारं देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. या नव्या वीज बिलांमध्ये कोणत्या दिवशी किती वीज वापरली याचेही तपशील देण्यात येणार आहेत. याशिवाय चुकीचं बिल किंवा वीज चोरीवरही आळा बसणार आहे.

हवी तेव्हा मोबाईलवरुन घरातील वीज बंद करता येणार

या नव्या वीज मीटरमुळे ग्राहकांना आपल्या मोबाईलवरुनच घरातील वीज चालू-बंद करता येणार आहे. त्यामुळे चुकून घरात लाईट सुरुच राहिली तर ती केव्हाही बंद करता येईल. यामुळे वीजेची तर बचत होणार आहेच, सोबत ग्राहकांच्या बिलातही बचत होईल. विशेष म्हणजे बिहारमध्ये विनाशुल्क हे मीटर बसवण्यात येत आहे. प्रीपेड मीटर लावल्यानंतर आधी रिचार्ज करावा लागेल आणि मगच त्या रकमेची वीज उपलब्ध होणार आहे.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नोंदवणे आवश्यक

वीज मीटर लावणाऱ्या कंपनीने वीज ग्राहकांना आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देण्यास सांगितलं आहे. यामुळे मीटर लावल्यानंतर ग्राहकांना आपल्या मोबाईल नंबरवर आणि ई-मेल आयडीवर वीज बिल पाठवता येणार आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशा ग्राहकांना जवळच्या वीज केंद्रावर जाऊन बिल घेता येणार आहे.

हेही वाचा :

24 तास वीज पुरवठ्यासाठी सरकारचा नवा निर्णय, नियम तोडणाऱ्या कंपनीवर काय कारवाई?

चिपळूणमध्ये 22 लाखांची वीज चोरी, चोरांविरोधात कठोर कारवाई

मुंबई आणि एमएमआर विभाग ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करणार; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निर्धार

Smart prepaid Electricity meter controlled by mobile in Bihar