ही प्रसिद्ध कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी देतेय एक आठवड्याची सुट्टी

| Updated on: Apr 03, 2021 | 8:30 PM

या सुट्टीची 5 एप्रिलपासून सुरुवात करण्यात येणार आहे. कंपनी हे यासाठी करीत आहे जेणेकरून त्यांचे कर्मचारी काही दिवस ताणतणावापासून दूर राहू शकतील आणि स्वतः फ्रेश होऊ शकतील. (This famous company gives a week off to all its employees to relax)

ही प्रसिद्ध कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी देतेय एक आठवड्याची सुट्टी
ही प्रसिद्ध कंपनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी देतेय एक आठवड्याची सुट्टी
Follow us on

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टच्या मालकीची व्यावसायिक सोशल नेटवर्क कंपनी लिंकेडीनने कोरोना महामारीच्या या टप्प्यात आपल्या कर्मचार्‍यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील जवळपास सर्व कर्मचार्‍यांना ही कंपनी जवळपास एका आठवड्यासाठी पगारी रजा देणार आहे. या सुट्टीची 5 एप्रिलपासून सुरुवात करण्यात येणार आहे. कंपनी हे यासाठी करीत आहे जेणेकरून त्यांचे कर्मचारी काही दिवस ताणतणावापासून दूर राहू शकतील आणि स्वतः फ्रेश होऊ शकतील.  लिंकेनडीन आपल्याला वेबसाईट किंवा मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून सर्विस देते. लिंकेडीन 2002 मध्ये लॉँच करण्यात आले होते. (This famous company gives a week off to all its employees to relax)

5 एप्रिलपासून लिंकनडीनचे कर्मचारी पगारी सुट्टीवर

सीएनएनच्या अहवालानुसार, लिंकेडीनमध्ये जगभरात काम करणारे सर्व कर्मचारी 5 एप्रिलपासून पगारी आठवडा सुट्टीवर असतील. या आठवड्याच्या सुट्टीच्या वेळी कर्मचार्‍यांना ताणतणावापासून दूर राहण्याची संधी मिळेल आणि ते स्वत:ला फ्रेश करू शकतील. कंपनीच्या जवळपास सर्व फुल टाईम 15,900 कामगारांना ही रजा दिली जात आहे. तथापि, कोअर टीम आठवडाभर काम करत राहील. नंतर या कर्मचार्‍यांना पगारी आठवडा सुट्टी देण्यात येईल.

काय म्हणाले चीफ पीपल अधिकारी?

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत लिंकेडीनची चीफ पीपल अधिकारी ट्युइला हॅन्सन म्हणाले की, आम्हाला आमच्या कर्मचार्‍यांना काहीतरी मौल्यवान देण्याची इच्छा होती आणि आम्हाला वाटते की यावेळी सर्वात मौल्यवान वस्तू ही वेळ आहे. ते असेही म्हणाले की, सर्व कर्मचारी एकाच वेळी रजेवर असल्याने ईमेल, मीटिंग नोट्स आणि प्रोजेक्ट विनंती सारख्या कामाचा ताण त्यांच्या अनुपस्थितीत वाढणार नाही. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ही कंपनी एका वर्षापेक्षा अधिक काळापासून रिमोटली काम करीत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी नियमितपणे आपल्या कर्मचार्‍यांचे सर्वेक्षण देखील करते.

लिंकेडीनचे हे नवीन फिचर करेल धमाल

जगभरात ऑडिओ चॅटिंग एक नवीन ट्रेंड बनत चालले आहे. इनवाइट-ओनली ऑडियो चैट एप Clubhouse च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लिंकेडीनने देखील हे फिचर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. लिंकेडीन 200 पेक्षा जास्त देशांमधील 740 दशलक्षाहून अधिक सदस्यांसाठी तत्सम अ‍ॅपवर काम करत आहे. अलिकडेच आघाडीच्या व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने टेकक्रंचबरोबरच्या आपल्या या योजनेबाबत पुष्टी करताना सांगितले की, ते ऑडिओ नेटवर्किंग सुविधेवर कार्यरत आहेत. लिंकेडीनने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही तुमच्या व्यावसायिक ओळखीशी संबंधित एखादा अनोखा ऑडिओ अनुभव तयार करण्यासाठी आम्ही काही प्रारंभिक चाचणी घेत आहोत. (This famous company gives a week off to all its employees to relax)

इतर बातम्या

Nashik Corona Update | कोरोनाला थोपवण्यासाठी मास्टर प्लॅन, बाजारात खरेदीसाठी आता पास लागणार, नवे नियम कोणते?

कामाची बातमी! UMANG App वरून घर बसल्या तपासा PF बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया