AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?

विवो इंडिया कंपनीचा नवा vivo Y31t 5G स्मार्टफोन भारतात दाखल झाला आहे. या फोनमध्ये तगडी बॅटरी असून तो मजबूतीला चांगला आहे. किती आहे या फोनची किंमत वाचा....

विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
vivo Y31t 5G
| Updated on: Aug 28, 2026 | 10:09 PM
Share

विवो इंडियाने अखेर वाय सिरीजचा vivo Y31t 5G नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केला आहे. या डीव्हाईसमध्ये वाढीव बॅटरी क्षमता आणि हार्डवेअर प्रोटेक्शन, ड्यु्अल आयपी इंग्रेस रेटिंग, मिलिट्री ग्रेड सर्टीफिकेशन अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.  vivo Y31t 5G चे मुख्य वैशिष्ट्ये त्याची दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि मजबूत बॉडी आहे. या फोनची आणखीन काय वैशिष्ट्ये आणि फिचर आहेत ते पाहूयात…

बॅटरी आणि चार्जिंग

विवोच्या या vivo Y31t 5G नव्या स्मार्टफोनमध्ये 7,200 mAh क्षमतेची तगडी बॅटरी आणि 44W FlashCharge देण्यात आला आहे.

पर्यावरण सुरक्षा – धुळ आणि पाण्यापासून सुरक्षेचे IP68 and IP69 रेटिंग आणि उच्च दाबाचे आणि उच्च तापमानाच्या पाण्याच्या जेट सुरक्षेसाठी याला IEC standard 60529 रेटिंग देण्यात आलेले आहे.

ड्रॉप आणि स्ट्रक्चरल टेस्टींग – या फोनला SGS गोल्ड लेबल फाइव्ह-स्टार ड्रॉप रेझिस्टन्स आणि मिलिटरी-ग्रेड हे टिकाऊपणाचे सर्टीफिकेट मिळालेले आहे.

याचा रिअर कॅमेरा सुईट सपोर्ट मल्टीपल ऑपरेशन मोडमध्ये सपोर्ट करतो. नाईट, पोट्रेट, प्रो, डॉक्युमेंट स्कॅनिंग, 50 MP चा हाय रिझोल्युशन कॅप्चर आणि तसेच खास अंडर वॉटर फोटोग्राफीसाठी हा कॅमेरा सुसज्ज आहे.

सॉफ्टवेअर

हा फोन Origin OS 6 सॉफ्टवेअरवर चालत असून AI Creation, Origin Island, Drag & Go, Private Space आणि vivo DocMaster यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

या फोनला 6.75 इंचाचा डिस्प्ले ( 1608 × 720 pixels ) HD+ LCD screen सह 120Hz रिफ्रेश रेटचा आहे. Octa Core Snapdragon 4 Gen 2 चा प्रोसेसर आहे. यात 4GB आणि 6GB LPDDR4x RAM मिळतो. तर 128GB ( UFS 3.1 ) इंटर्नल storage मिळते. या फोनला ड्युअल सिम ( nano + nano + microSD ) आहे. यात ओरिजिन OS 6 सह एण्ड्रोईड 16 आहे.

या फोनला 50MP चा रिअर कॅमेरा, 2MP portrait कॅमेरा, सह एलईडी फ्लॅश आहे. तर 8MP चा फ्रंड कॅमेरा आहे. या फोनला साईड माऊंटेड फिंगर सेंसर असून त्याचा आकार 166.64x 78.43x 8.39mm तर वजन 219 ग्रॅम आहे.

किंमत काय ?

या स्मार्टफोनच्या 4 GB + 128 GB मॉडेलची किंमत INR 25,999 आहे. अनुक्रमे 6 GB + 128 GB  मॉडेलची INR 29,999 रुपये, 6 GB + 256 GB मॉडेलची  INR 34,999 अशी आहे. हा फोन तुम्ही vivo India e-store , Flipkart वरुन आणि पार्टनर रिटेल स्टोअरमधून विकत घेऊ शकता.

लाँच ऑफर काय ?

31 ऑगस्टपर्यंत या फोनवर 1,500 रुपयांची कॅशबॅक ऑफर असून ती SBI Card, HDFC Bank, Axis Bank, IDFC FIRST Bank, YES BANK, BOBCARD, IndusInd Bank, आणि इतर बँकांच्या क्रेडिटकार वर लागू आहे. तसेच 10 महिन्यांच्या ईएमआयवर झिरो डाऊन पेमेंट फायनान्सवरही तो मिळत आहे. जिओवर सहा महिन्यांचे 10 OTT apps आणि ऑप्शनल V-Shield protection plans देखील आहेत.

Follow Us