WhatsApp कडून ‘हे’ 5 फिचर्स लवकरच युजर्सच्या भेटीला

ठराविक काळानंतर WhatsApp मध्ये काहीना काही नवे फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. अनेकदा काही फिचर्स तर केवळ टेस्टिंगसाठी येतात आणि नंतर ते हटवलेही जातात. आता WhatsApp लवकरच 5 फिचर्स घेऊन येत आहे.

WhatsApp कडून 'हे' 5 फिचर्स लवकरच युजर्सच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jul 06, 2019 | 5:37 PM

मुंबई : WhatsApp जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. भारतात याचे सर्वाधिक यूजर्स आहेत. ठराविक काळानंतर WhatsApp मध्ये काहीना काही नवे फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. अनेकदा काही फिचर्स तर केवळ टेस्टिंगसाठी येतात आणि नंतर ते हटवलेही जातात. आता WhatsApp लवकरच 5 फिचर्स घेऊन येत आहे.

  1. Dark Mode

WhatsApp मागील काही काळापासून ‘डार्क मोड’साठी टेस्टिंग करत आहे. अनेक युजर्स या फिचरची वाट पाहत आहे. या फिचरबाबत अनेक बातम्याही आल्या. यानुसार डार्क मोड WhatsApp च्या वेगवेगळ्या सेक्शनला लागू होईल, असे सांगण्यात आले. मात्र, आता हे फिचर लवकरच येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

  1. Fingerprint Authentication

WhatsApp ने iOS युजर्ससाठी फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचे फिचर काही दिवसांपूर्वीच उपलब्ध करुन दिले होते. अॅपलच्या स्मार्टफोनला फेस आयडी आहे, त्यांना WhatsApp ने फेस आयडीचीही सुविधा दिली. मात्र, अँड्रॉईडमध्ये हे फिचर उपलब्ध होणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. आता नव्याने मिळत असलेल्या माहितीनुसार कंपनी अँड्रॉईड युजर्सला देखील फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचे फिचर उपलब्ध करुन देणार आहे.

  1. Status share feature

इंस्टाग्राम, मेसेंजर आणि वॉट्सअपला मर्ज करुन एक सामाईक मेसेजिंग प्लॅटफॉर्म तयार करावा, असा विचार फेसबुकचे प्रमुख (CEO) मार्क झुकरबर्ग यांचा असल्याचेही सांगितले जात आहे. यावर कामही सुरु आहे. युजर्सला आपले WhatsApp चे स्टेटस थेट फेसबुकवरही शेअर करता येईल, असे फिचर लवकरच येणार आहे. सध्या मेसेंजरवरुन ज्या पद्धतीने फेसबुकवर शेअरिंग करता येते, अशाचप्रकारे हे नवे फिचर काम करेल.

  1. Ranking contacts

WhatsApp मध्ये लवकरच रँकिंग कॉन्टॅक्ट्सचे फिचरही उपलब्ध होईल. या फिचरमध्ये युजर्स ज्यांच्याशी अधिक बोलणे होते त्यांना मार्क करुन क्रमवारीत सर्वात वरती ठेऊ शकता. यामुळे अनेक फायदे होणार आहेत. महत्त्वाच्या आणि व्यक्तींना शोधण्यात वेळ वाया जाणार नाही. या व्यक्तींना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन शोधावे लागणार नाही. हे फिचर ऑटोमेटिकही काम करेल आणि तुम्ही सर्वात जास्त चॅट करतात त्यांना क्रमावारीत प्रथम घेईल.

  1. QR Code feature

WhatsApp युजर्ससाठी QR Code चेही फिचर आणणार आहे. याबाबतचा एक स्क्रिनशॉट देखील पहायला मिळत आहे. या फिचरची देखील टेस्टिंग होत असल्याचे सांगितले जात आहे. या कोडच्या सहाय्याने युजर्स एकमेकांना सहजपणे जोडले जाऊ शकतात. सध्या फेसबुक मेसेंजरमध्ये हे फिचर उपलब्ध आहे. या QR Code चा उपयोग युजर्स आपल्या व्हिजिटिंग कार्डवरही करु शकणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.