मृत्यूनंतर iPhone वर कुणाचा हक्क, नियम सांगतो काय?
Apple iPhone Legal Heir Rules: ॲप्पलच्या Legacy Contact फीचर युझर्सच्या मृत्यूनंतर त्या फोनचा ताबा कुणाला द्यायचा आणि त्याचा वापर कुणी करावा याविषयीची सुविधा देते. काय आहे या विषयीचा नियम?

देशातच नाही तर जगभरात iPhone ची मोठी क्रेझ आहे. आयफोनच्या नवीन सीरीजवर सुद्धा तरुणाईच्या उड्या पडल्या आहेत. पण युजर्झच्या मृत्यूनंतर फोनमधील जतन केलेले फोटो, महत्त्वाच्या फाईल्स, कॉन्टॅक्ट्सपासून इतर महत्त्वाची माहितीचे काय होते? आता स्मार्टफोनचा वापर केवळ कॉल आणि मॅसेजसाठी वापरल्या जात नाही. स्मार्टफोनने आपले आयुष्य व्यापले आहे. यामध्ये युझर्सची कॉन्फिडेन्शिअल, गोपनीय माहिती जतन झालेली असते. जर आयफोन खरेदीदाराचा, मालकाचा मृत्यू झाला तर ॲप्पलच्या Legacy Contact फीचरनुसार, त्या फोनचा ताबा कुणाला द्यायचा आणि त्याचा वापर कुणी करावा याविषयीची सुविधा ॲप्पल कंपनी देते. काय आहे या विषयीचा नियम?
Apple चे Legacy Contact फीचर काय?
Legacy Contact नुसार, युझर्सच्या मृत्यूनंतर ॲप्पल खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती त्याचा वारस, पत्नी, मुलगा, आई-वडील कोणालाही मिळू शकतो. ही सुविधा iOS 15.2, iPadOS 15.2 आणि macOS 12.1 अथवा त्यानंतरच्या पुढील सीरीजमध्ये उपलब्ध आहे. युझर त्याचा विश्वासू मित्र अथवा कुटुंबातील सदस्याला Legacy Contact करू शकतो.
त्यासाठी त्याला Apple एक Unique Access Key देते. त्याचा वापर युझरच्या मृत्यूनंतर करता येतो. जेव्हा Legacy Contact Apple कडे डेटा देण्याची परवानगी मागतो, तेव्हा योग्य कागदपत्रांसह ही Access Key सुद्धा द्यावी लागते. म्हणजे केवळ Legacy Contact मध्ये वारसाचे नाव जोडल्याने त्याला ॲप्पलकडून डेटा ॲक्सेसची परवानगी देण्यात येत नाही. Apple ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही परवानगी देण्यात येते.
Legacy Contact अंतर्गत ॲक्सेस काय?
Legacy Contact ला Apple Account मधील काही डेटा ॲक्सेस देण्यात येतो. संपूर्ण माहिती देण्यात येत नाही. काही संवेदनशील आणि खासगी माहिती गोपनीय ठेवण्यात येते. याविषयीची माहिती लिगसी कॉन्टॅक्टमध्ये उपलब्ध नसते.
iPhone, iPad वा Mac मध्ये Legacy Contact चा वापर कसा कराल?
जर तुम्ही Legacy Contact सेट करू इच्छित असाल तर iPhone अथवा iPad मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
सर्वात अगोदर Settings उघडा
त्यानंतर तुमचे नाव अथवा Apple Account वर टॅप करा
आता Sign-In & Security मध्ये जा
Legacy Contact हा पर्याय निवडा
Add Legacy Contact वर टॅप करा
आता Face ID, Touch ID वा डिव्हाईस पासकोडच्या माध्यमातून तुमची ओळख पक्की करा
