AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13 वर्षांच्या मुलीने 3 दिवसांत कमावले 2.5 लाख; ना कोडिंगचं ज्ञान, ना अनुभव तरी केली ही कमाल

एका वर्षांच्या मुलीने ही कमाल केली आहे. फक्त तीन दिवसांत तिने अडीच लाख रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे तिला प्रोग्रामिंग किंवा कोडिंगचंही ज्ञान नाही. तरी तिने मुलांच्या अभ्यासासाठी भन्नाट App बनवलं आहे.

13 वर्षांच्या मुलीने 3 दिवसांत कमावले 2.5 लाख; ना कोडिंगचं ज्ञान, ना अनुभव तरी केली ही कमाल
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 01, 2026 | 12:11 PM
Share

आजच्या काळात AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) म्हणजे फक्त मोठ्या कंपन्यांसाठीचं तंत्रज्ञान राहिलेलं नाही. ही बाब चीनमधल्या एका 13 वर्षांच्या मुलीने सिद्ध करून दाखवलं आहे. शांघायमध्ये शिकणाऱ्या झू शुहान या मुलीने कोणताही प्रोग्रामिंगचा अनुभव नसताना एआयच्या मदतीने एक स्टडी ॲप तयार केलं. त्यातून अवघ्या तीन दिवसांत तिने तब्बल 18 हजार युआन म्हणजेच सुमारे 2.5 लाख रुपयांची विक्री केली. तिची ही कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. झू शुहान ही ज्युनियर सेकंडरी स्कूलमध्ये शिकते. विशेष म्हणजे तिला कोडिंग किंवा प्रोग्रामिंगचं विशेष ज्ञान नव्हतं. तिने अवघ्या वर्षभरापूर्वी एआय वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र, एका दैनंदिन समस्येवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नातून तिने स्वतःचं AI प्रोडक्ट तयार केलं.

ॲपमध्ये नेमकं काय?

शुहानने तयार केलेल्या ‘Zai Chang’ म्हणजेच ‘On Site’ या ॲपचा उद्देश मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्यासाठी पालकांना मदत करणं हा आहे. पालक ॲपमध्ये स्वतःचा फोटो अपलोड करतात. त्यानंतर AIच्या मदतीने त्या फोटोवर आधारित एक व्हर्च्युअल पॅरेंट तयार केला जातो. मुलं अभ्यास करत असताना कॅमेरा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. मूल मोबाईल वापरू लागलं किंवा अभ्यासाची जागा सोडून उठलं तर स्क्रीनवर दिसणारा व्हर्च्युअल पालक आवाजाच्या माध्यमातून त्याला पुन्हा अभ्यासाकडे लक्ष देण्याची आठवण करून देतो. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ॲप ‘कन्संट्रेशन रिपोर्ट’ देखील तयार करतं.

स्वतःच्याच समस्येतून सुचली भन्नाट कल्पना

या ॲपची कल्पना शुहानला तिच्या स्वतःच्या अनुभवातून सुचली. तिचे आई-वडील व्यस्त असल्यामुळे ते नेहमी तिच्यासोबत बसून अभ्यास करवून घेऊ शकत नव्हते. त्यामुळे अभ्यास करताना तिचं लक्ष विचलित व्हायचं आणि ती कधी कधी लपून मोबाईल वापरायची. तिच्या मित्रांनाही अशीच समस्या असल्याचं तिला जाणवलं. त्यामुळे तिने ‘डिजिटल पॅरेंट क्लोन’ तयार करण्याचा विचार केला.

एआयने लिहून दिलं ॲपचं कोडिंग!

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शुहानने तिची कल्पना LLM म्हणजेच मोठ्या भाषिक मॉडेलला साध्या भाषेत समजावून सांगितली. AIने तिला कोड तयार करण्यात आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यात मदत केली. ॲपची डिझाइन आणि मुख्य फीचर्स तयार करण्यासाठी तिला फक्त 3 ते 4 दिवस लागले. 21 ते 23 ऑगस्टदरम्यान हांगझोऊ इथं झालेल्या राष्ट्रीय AI प्रोडक्ट मार्केटिंग स्पर्धेत तिच्या अॅपला जवळपास 90 ऑर्डर्स मिळाल्या. त्यातून 18 हजार युआनची विक्री झाली आणि शुहानने तिसरा क्रमांक पटकावला.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती