
किंमत कमी आणि जास्त मायलेज. भारतीय बाजारपेठेतील पाच कार ज्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक स्टाइलिंग आणि मजबूत बिल्ड क्वालिटीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेवटची तर लाखो नागरिकांची आवडती.

रेनॉल्ट काइगरचे नाव डिझाइनच्या बाबतीत आघाडीवर घेतले जाते. कूपेसारखी रूफलाइन आणि ट्राय-ऑक्टा LED हेडलाइट्समुळे तिला मॉडर्न आणि स्पोर्टी लुक मिळतो. मस्क्युलर बॉडी आणि एअरोडायनामिक शेपमुळे ही गाडी दूरून पाहिल्यावर लक्झरी क्रॉसओव्हरसारखी वाटते.

टाटा पंचने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. उंच बोनट, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चरमुळे ही गाडी मोठ्या SUVच्या रांगेत उभी असल्याचा भास देते. कमी किंमत असूनही डिझाइन आणि फिनिशिंगमध्ये कोणतीही तडजोड न केल्यामुळे पंच महागड्या गाड्यांमध्येही उठून दिसते.

टाटा मोटर्सने नेक्सनच्या माध्यमातून डिझाइनमध्ये नवा ट्रेंड सेट केला आहे. कर्व्ड रूफलाइन, फ्यूचरिस्टिक LED लाइट सेटअप आणि आकर्षक ग्रिलमुळे नेक्सनला प्रीमियम SUVचा फील मिळतो.

हुंडई एक्सटर ही मायक्रो-SUV असली तरी तिचा बॉक्सी डिझाइन आणि H शेप LED सिग्नेचर लाइट्स खूप वेगळेपण देतात. फ्रंट लुक, रूफ रेल्स आणि शार्प कट्समुळे ही कार अधिक उंच आणि प्रीमियम दिसते.

मारुती स्विफ्ट अनेक वर्षांपासून भारतीय तरुणांची पहिली पसंती राहिली आहे. 2026 मॉडेलमध्ये अधिक स्पोर्टी आणि शार्प डिझाइन देण्यात आले आहे. स्लीक हेडलाइट्स, मस्क्युलर बंपर आणि युनिक अलॉय व्हील्समुळे ही गाडी महागड्या युरोपियन हॅचबॅकसारखी दिसते.