AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारच्या इंजिनमध्ये काळ… बोनट उघडताच 7 फूटाचा अजगर पाहून थरकाप; दहिसरच्या घटनेने सर्वच हादरले

दहिसरमध्ये एका कारच्या इंजिनमध्ये 7 फुटी अजगर सापडल्याने मोठी खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ वन्यजीव बचाव पथकाला कळवले. सर्पमित्र समीर गुप्ता यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या अजगराला बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. मुंबईतील या घटनेने नागरिकांमध्ये धक्का आणि आश्चर्याची भावना आहे.

कारच्या इंजिनमध्ये काळ... बोनट उघडताच 7 फूटाचा अजगर पाहून थरकाप; दहिसरच्या घटनेने सर्वच हादरले
PythonImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 2:47 PM
Share

जरा विचार करा… तुम्ही कारचं बोनट उघडलं आणि तुमच्यासमोर भला मोठा अजगर वेटोळे घालून बसलेला दिसला तर काय कराल? या भल्या मोठ्या अजगराला पाहून तुमची बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या दहिसरमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक 7 फूटाचा अजगर कारच्या बोनटमध्ये काळ बनून आरामात बसल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ पाहूनच अनेकांची तंतरली आहे. अंगाचा थरकाप उडाला आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही, इतकं हे भयानक दृश्य आहे.

दहिसरच्या फ्लायओव्हरच्या जवळ महेश्वरी इमारत आहे. कांदारपाड्याच्या बापू बागवे रोडवर ही इमारत आहे. स्थानिक रहिवाशी सन्नी कांबळे यांच्या बहिणीची कार या इमारतीत पार्क करण्यात आलेली होती. शनिवारी दुपारी ही कार इमारतीत पार्क होती. यावेळी काही लोकांनी एक महाकाय अजगर हळूहळू या कारच्या खालून बोनटच्या आत जाताना पाहिला. त्यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली. कारमध्ये साधासुधा काप नाही तर अजगर जाऊन बसल्याचं सोसायटीतील लोकांना कळताच लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली.

अजगर पकडताना तारेवरची कसरत

हा अजगर पाहण्यासाठी कारच्या आसपास मोठी गर्दी झाली. कारच्या मालकालाही तात्काळ याची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिकांनी वन्यजीव रेस्क्यू टीमशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावलं. रेस्क्यू एक्सपर्ट समीर गुप्ता यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुप्ता यांनी कारचं बोनट उघडलं तर त्यांनाही धक्का बसला. समोर वेटोळे घालून भला अजगर बसला होता. या अजगराने इंजिनला मजबूत वेटोळे घातले होते. त्यानंतर समीर गुप्ता यांनी मोठ्या शिताफिने या अजगरला कोणतीही इजा न करता अलगद पकडलं. विशेष म्हणजे त्याला पकडकताना गुप्ता यांनाही तारेवरची कसरत करावी लागली. कारण हा अजगर अत्यंत महाकाय होता.

अन् सुटकेचा नि:श्वास सोडला

त्यानंतर या अजगराला पकडून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडून देण्यात आलं. अजगराला जंगलात सोडण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गरम इंजिनमुळे त्याला इजा तर नाही ना पोहोचली, हे चेक करण्यासाठी मेडिकल तपासणी करण्यात आली. अजगराला कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री पटल्यावर त्याला जंगलात सोडून देण्यात आलं. जेव्हा अजगर कारच्या बोनटमधून काढण्यात आला, तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, सोसायटीत भला मोठा अजगर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

ट्रेनमध्ये सापडला होता अजगर

जून महिन्यात अशीच एक घटना समोर आली होती. मडगाव-सीएसएमटी जन शताब्दी एक्सप्रेसच्या इंजिन केबिनमध्ये अजगराचं एक पिल्लू आढळून आलं होतं. रेल्वे टीम आणि पशू कल्याण अधिकाऱ्यांनी तात्काळ अजगर पकडून त्याला जंगलात सोडलं होतं. 24 जूनच्या रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली. ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचल्यावर प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वर काही वेळातच इंजिन केबिनमध्ये अजगराचं पिल्लू दिसलं होतं.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय