AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…

80s AI Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2026 मधील फोटो काही क्षणांत 1980च्या दशकातील फोटोसारखे तयार करता येत असल्याने अनेकजण या ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत.

80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! 'या' चुका टाळा, नाही तर...
80s AI Photo TrendImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 9:20 PM
Share

सोशल मीडिया स्क्रोल करताना सध्या सगळ्यांना फक्त एकच गोष्ट दिसत आहे, ती म्हणजे ’80s ट्रेंड’. हा ’80s ट्रेंड’ नक्की काय आहे, याची कदाचित तुम्हाला माहिती मिळाली असेलच. पण ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचे तर, याआधी जसा घिबली आणि नॅनो बनाना फोटो बनवण्याचा ट्रेंड आला होता, अगदी तसाच आता हा नवा ’80s फोटो ट्रेंड’ आला आहे. याच्या मदतीने तुम्ही आत्ताच्या काळातील म्हणजेच २०२६ मधील तुमचे फोटो थेट १९८० च्या दशकातील जुन्या फोटोंसारखे बनवू शकता.

आधीच्या ट्रेंडप्रमाणेच यासाठीही तुम्हाला काही ‘फोटो प्रॉम्प्ट’ लागतात. हे प्रॉम्प्ट टाकल्यानंतर तुम्ही हुबेहूब ८० च्या दशकातील व्यक्तींसारखे दिसू लागता आणि तुमच्या आसपासचा परिसरही अगदी तसाच दिसू लागतो. यामुळेच हा ट्रेंड सध्या झपाट्याने व्हायरल झाला आहे. पण सावधान! असे फोटो बनवताना तुम्हाला काही चुका करणे प्राधान्याने टाळायचे आहे. तसे न केल्यास तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमचे खाजगी आणि संवेदनशील फोटो अपलोड करण्याची चूक अजिबात करु नका. तुमचे किंवा तुमच्या कुटुंबियांचे अत्यंत खाजगी फोटो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अपलोड करणे टाळा. अशा एआय (AI) फोटो टूल्सवर तुमच्या खाजगी गोष्टी शेअर केल्यास, तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊन बँक खाते हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच, या ट्रेंडच्या नावाखाली व्हायरल होणाऱ्या कोणत्याही धोकादायक लिंकवर चुकूनही क्लिक करु नका. जर तुम्हाला एखादे अनोळखी अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जात असेल, तर अशावेळी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, असे फोटो जनरेट करण्यासाठी कोणत्याही पासवर्ड, पिन किंवा ओटीपीची (OTP) आवश्यकता नसते. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत साईटवर आपली खाजगी माहिती शेअर करु नका. या काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला कोणताही धोका उद्भवणार नाही. मात्र याव्यतिरिक्तही सोशल मीडिया वापरताना नेहमीच सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा