AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2023 : धावपळीतही जीवनाचा आनंद घेणारा मुंबईकर, लाईफलाइन लोकलमधील होळीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईकर त्यांच्या आवडत्या लोकलमध्ये सर्व सण साजरे करीत असतात. अगदी दसरा असो की दांडीया मुंबईकरांच्या सर्व सणांची सुरूवात त्यांच्या आवडत्या लोकलमधूनच करीत असतात.

Holi 2023 : धावपळीतही जीवनाचा आनंद घेणारा मुंबईकर, लाईफलाइन लोकलमधील होळीचा व्हिडीओ व्हायरल
holi in localImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 07, 2023 | 8:49 AM
Share

मुंबई : कोणताही बिकट प्रसंग असो किंवा नैसर्गिक संकट मुंबईकर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला धावत असतो. नेहमी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारा मुंबईकर धावपळीतही जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद  घेत असतो. तसेच आपले धकाधकीचे धावपळीचे आयुष्य विसरून  प्रत्येक क्षण साजरा करीत असतो. अशाच प्रकारे होळीच्या सणाचाही मुंबईकर उपनगरीय लोकलमध्येही कसा आनंद लुटत याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला समाजमाध्यमावर खूप पाहिले जात आहे.

मुंबईकरांच्या लोकल ट्रेनमधील होळीचा व्हिडीओ डॉ. प्रशांत भामरे यांनी सोशल साईट ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शनही छान लिहीली आहे. मुंबई स्पीरीट, कशाही परिस्थितीत असा आनंद घेता आला पाहिजे, हॅप्पी होळी ! अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओत प्रवासी हिंदी गाण्यांची एक प्रकारे अंताक्षरीच खेळताना दिसत आहे. सुन चंपा..सुन तारा या गीतावर प्रवासी आनंद घेत असून त्यांच्या गालाला आणि कपाळाला गुलाल लावल्याचे दिसत आहे. अगदी लोकलच्या पॅनलवरही हाताने आवाज काढीत ताल धरला जात आहे. सर्व प्रवासी या गाण्यांवर ठेका धरून नाचत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मुंबईकर त्यांच्या आवडत्या लोकलमध्ये सर्व सण साजरे करीत असतात. अगदी दसरा असो की दांडीया मुंबईकरांच्या सर्व सणांची सुरूवात त्यांच्या आवडत्या लोकलमधूनच करीत असतात. दसऱ्याच्या सणाला लोकलच्या डब्यांना तोरणे लावली जात असतात. लांबपल्ल्याच्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये मनमाडवासीय तर चक्क गणपती बाप्पाची स्थापना दरवर्षी करीत असतात.

हा पाहा व्हिडीओ..

मुंबईची लोकल म्हणजे दररोज ७५ लाख प्रवाशांची वाहतूक करणारी मुंबईकरांची जीवन वाहिनीच म्हटली जाते. या लोकलमध्ये मुंबईकर त्यांच्या आयुष्यातील काही तास प्रवासात घालवत असतात. त्यामुळे रोजच्या प्रवासातील नेहमीचे प्रवासी त्यांचे सगे सोबती होतात. त्यांच्या सोबत आयुष्यातील सर्व सुखाचे आणि दु:खाचे क्षण ते दररोज एकमेकांशी शेअर करीत असतात, अशा मुंबईकरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण दाखविणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट