Video | ओह तेरी! बघता बघता तरुणाने ब्रिजवरून थेट उडीच मारली, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…

धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असतात. ज्यावर कधीकधी विश्वास ठेवणे कठीण होते. असे काही व्हिडीओ आहेत, जे पाहिल्यावर ते लोकांच्या मनावर आणि डोक्यात कायमस्वरूपी टिपले जातात.

Video | ओह तेरी! बघता बघता तरुणाने ब्रिजवरून थेट उडीच मारली, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले...
Man jump from bridge

मुंबई : धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असतात. ज्यावर कधीकधी विश्वास ठेवणे कठीण होते. असे काही व्हिडीओ आहेत, जे पाहिल्यावर ते लोकांच्या मनावर आणि डोक्यात कायमस्वरूपी टिपले जातात. अशातच सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहणे देखील अशक्त मनाच्या लोकांसाठी धोक्याचे काम आहे.

आपल्या सर्वांना हे माहित आहे की, जगातील काही लोक अस्सल ‘डेंजर प्लेयर’ असतात. त्यांना पाहून असे वाटत नाही की, त्यांचा कधीही भीती वाटली असेल! आता फक्त या माणसाकडे पाहा. जेव्हा या माणसाने उंच पुलावरून स्केटबोर्डवरून जोशात उडी मारली, तेव्हा बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला….

पाहा हा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, पुलाच्या एका भागावर एक माणूस स्केटबोर्ड ठेवतो, त्यावर चढतो आणि खाली दरीत उडी मारतो. काही कालांतराने त्याने त्याचे पॅराशूट उघडले, परंतु हे संपूर्ण दृश्य पाहून लोकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया वापरकर्ते हैराण झाले आहेत. यामुळे अनेक वापरकर्त्यांनी यावर भाष्य केले. एका वापरकर्त्याने म्हटले की, हा स्टंट नाही तर आत्महत्या आहे. दुसरीकडे, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की पृथ्वीवरील इतर कोणाकडे कदाचितच इतकी शक्ती असेल! या व्यतिरिक्त इतर बर्‍याच वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिली आहेत.

(A stunt man jump from Highest bridge with skate board video goes viral on social media)

हेही वाचा :

Video | भोजपुरी गाण्यावर काकूंचा ‘धमाका डान्स’; हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !

Video | लोकांनी गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलेचा प्रताप, सर्वांसमोरच लागली केसांसोबत खेळायला, पाहा व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI