Video | भोजपुरी गाण्यावर काकूंचा ‘धमाका डान्स’; हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मात्र काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक काकू अतिशय उत्साही होऊन एका भोजपुरी गाण्यावर घडाकेबाज डान्स करत आहेत. लोक या काकूच्या डान्सचे दिवाने झाले आहेत.

Video | भोजपुरी गाण्यावर काकूंचा 'धमाका डान्स'; हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !
bhabhi-dance viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राण्यांची झुंज तर कधी लोकांच्या भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधीकधी तर सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ आपल्या समोर येतात; ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मात्र काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक काकू अतिशय उत्साही होऊन एका भोजपुरी गाण्यावर धडाकेबाज डान्स करत आहेत. लोक या काकूच्या डान्सचे दिवाने झाले आहेत. (woman dancing very energetically on bhojpuri song video went viral on social media)

पदर ढळू न देता काकूंचा डान्स

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक काकू मजेदार डान्स करत आहेत. डान्स करणाऱ्या तरुणासोबत या काकूंनीसुद्धा ठेका धरला आहे. या काकूचा डान्स पाहण्यासाठी बऱ्याच महिला आणि पुरुषांनी गर्दी केली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या काकूंनी डोक्यावर पदर घेतला असून तो किंचितही ढळू न देता काकू डान्स करत आहेत.

काकूंची एनर्जी भल्याभल्या डान्सर्सना लाजवेल

विशेष म्हणजे डान्स करतानाचे या काकूंचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. काकूंची डान्स करतानाची एनर्जी भल्याभल्या डान्सर्सना लाजवेल अशी आहे. या काकू डान्स करताना उड्यासुद्धा मारत आहेत. तसेच गाण्याच्या तालावर चेहऱ्यावर मजेदार हावभावसुद्धा करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, भोजपुरी गाण्यावर थिरकल्यामुळे या काकूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला असून त्याला मजेदार कॅप्शन दिले आहे. धमाका डान्स म्हणत हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | लोकांनी गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलेचा प्रताप, सर्वांसमोरच लागली केसांसोबत खेळायला, पाहा व्हिडीओ

Video | आधी झुंज नंतर हार, विषारी कोब्राने दुसऱ्या सापाला गिळंकृत केलं, व्हिडीओ व्हायरल

Lionel Messi Biri | प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचा बोलबाला, विडीच्या पॅकेटवर फोटो झळकल्याने धुमाकूळ

(woman dancing very energetically on bhojpuri song video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI