Video | आधी झुंज नंतर हार, विषारी कोब्राने दुसऱ्या सापाला गिळंकृत केलं, व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातल्या शेल्हाळ येथे एका कोब्रा सापाने विषारी असलेल्या दुसऱ्या सापाला चक्क गिळंकृत केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Video | आधी झुंज नंतर हार, विषारी कोब्राने दुसऱ्या सापाला गिळंकृत केलं, व्हिडीओ व्हायरल
cobra snake


लातूर : जिल्ह्यातल्या शेल्हाळ येथे एका कोब्रा सापाने विषारी असलेल्या दुसऱ्या सापाला चक्क गिळंकृत केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कोब्रा साप आपल्या एव्हड्याच लांबीचा साप गिळंकृत करू शकतो यावर सहजा-सहजी कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र उदगीर तालुक्यातील शेल्हाळ येथे हा प्रकार समोर आला आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. (Latur Cobra snake swallowed another snake video went viral on social media)

कोब्रा सापाने दुसऱ्या सापाला चक्क गिळंकृत केलं 

मिळालेल्या माहितीनुसार उदगीर तालुक्यातील शेल्हाळ येथे एका कारखान्याच्या जागेत कोब्रा आणि परड जातीच्या सापामध्ये झुंज झाली. यावेळी दोघांमध्येही अटीतटीची झुंज झाली. मात्र, शेवटी अतिशय विषारी साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोब्रा सापासमोर परड जातीच्या सापाने हार माणली. त्यानंतर या सापाला कोब्रा सापाने चक्क गिळंकृत केलं.

सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले

हा प्रकार घडताना लोकांचे लक्ष या सांपाकडे गेले. त्यानंतर लोक जमा झाल्याचे लक्षात आल्यावर कोब्रा सापाने गिळलेल्या परड सापाला बाहेर फेकून दिले. मात्र तोपर्यंत परड जातीच्या सापाचा मृत्यू झाला होता. हा प्रकार घडल्यानंतर लोकांनी सर्पमित्र शाम पिंपरे यांना बोलावले. त्यानंतर पिंपरे यांनी कोब्रा सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. एका सापाने दुसऱ्या सापाला गिळंकृत केल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

ब्लॅक मांबा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विषारी साप

दरम्यान कोब्रा जातीच्या सापाला जगातील सर्वांत विषारी साप म्हटले जाते. त्यानंतर सर्वात विषारी साप म्हणून ब्लॅक मांबा या सापाची ओळख आहे. या सापाला साक्षात यम म्हटले जाते. हा साप सर्वात विषारी दहा सापांच्या प्रजातीमधील एक साप असून त्याच्या दंशामुळे माणसाचा अवघ्या 15 मिनिटांमध्ये मृत्यू होऊ शकतो. आफ्रिकेत या सापाच्या दंशामुळे एका वर्षात तब्बल 20 हजार माणसांचा मृत्यू होतो.

काही सेकदांत 12 वेळा चावा घेतो

हा साप अत्यंत चपळ आहे. ब्लॅक मांबाच्या चपाळाईबद्दल सांगायचे झाले तर तो तासी 20 किलोमीटरच्या वेगाने सरपटत चालतो. म्हणजे हा साप एकदा का मागे लागला तर त्याच्यापासून सुटका करुन घेणे जवळजवळ अशक्य आहे. हा साप काही सेकंदामध्ये तब्बल 10 ते 12 वेळा चावा घेतो. एकदा दंश केला की हा साप 400 मिलीग्रॅम विष सोडतो. ब्लॅक मांबा या सापाचे एक थेंब जरी विष आपल्या शरीरात गेले तरी मृत्यू होण्याची शक्यता असते. एकदा का दंश केला की, त्यापासून मृत्यू होण्याची शक्यता ही 95 टक्के असते.

इतर बातम्या :

Buldhana | संग्रामपूरच्या वानखेड फाटादरम्यान नाग नागिणीचा प्रणयक्रीडा कैद

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI