जगातील सर्वात विषारी साप, दंश केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात होतो मृत्यू, जाणून घ्या ‘ब्लॅक मांबा’बद्दल

कोब्रा सापानंतर नाव घेतले जाते ते ब्लॅक मांबा या सापाचे. या सापाला साक्षात यम म्हटले जाते. आफ्रिकेत या सापाच्या दंशामुळे एका वर्षात तब्बल 20 हजार माणसांचा मृत्यू होतो.

जगातील सर्वात विषारी साप, दंश केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात होतो मृत्यू, जाणून घ्या 'ब्लॅक मांबा'बद्दल
BLACK MAMBA

मुंबई : साप पाहिला की प्रत्येकजण घाबरतो. या जगात सापाच्या अशा अनेक प्रजाती आहेत, ज्याच्या दंशामुळे काही मिनिटांत प्राण जातात. यामध्ये सर्वांत विषारी सापांमध्ये कोब्रानंतर नाव घेतले जाते ते ब्लॅक मांबा या सापाचे. या सापाला साक्षात यम म्हटले जाते. हा साप सर्वात विषारी दहा सापांच्या प्रजातीमधील एक साप असून त्याच्या दंशामुळे माणसाचा अवघ्या 15 मिनिटांमध्ये मृत्यू होऊ शकतो. आफ्रिकेत या सापाच्या दंशामुळे एका वर्षात तब्बल 20 हजार माणसांचा मृत्यू होतो. (know about most poisonous snake black mamba detail information in marathi)

काही सेकदांत 12 वेळा चावा घेतो

हा साप अत्यंत चपळ आहे. ब्लॅक मांबाच्या चपाळाईबद्दल सांगायचे झाले तर तो तासी 20 किलोमीटरच्या वेगाने सरपटत चालतो. म्हणजे हा साप एकदा का मागे लागला तर त्याच्यापासून सुटका करुन घेणे जवळजवळ अशक्य आहे. हा साप काही सेकंदामध्ये तब्बल 10 ते 12 वेळा चावा घेतो. एकदा दंश केला की हा साप 400 मिलीग्रॅम विष सोडतो. ब्लॅक मांबा या सापाचे एक थेंब जरी विष आपल्या शरीरात गेले तरी मृत्यू होण्याची शक्यता असते. एकदा का दंश केला की, त्यापासून मृत्यू होण्याची शक्यता ही 95 टक्के असते.

सहारा-आफिक्रेत आढळतो ब्लॅक मांबा

हा साप कल्पेनेपेक्षा कितीतरी जास्त विषारी आणि धोकादायक आहे. या सापाचा रंग भुरकट, ऑलिव ग्रीन, ग्रे असतो. याचे नाव ब्लॅक मांबा असले तरी तो काळा नसतो. हा साप विशेषत: सहारा आणि आफ्रिकेमध्ये आढळतो. ब्लॅक मांबा हे साप प्रामुख्याने झाडावर आढळतात.

एकूण 11 वर्षाचे आयुर्मान

हा साप एकूण 2 मीटरपर्यंत लांब असतो. मात्र, काही अपवादात्मक स्थितीत हा साप 4.5 मीटरपर्यंतसुद्धा वाढतो. ब्लॅक मांबा एका वेळेस 6 ते 25 अंडे देतो. एकदा अंडे दिल्यानंतर मादा ब्लॅक मांबा या अंड्यांना सोडून देते. त्यानंतर जन्म घेतलेल्या ब्लॅक मांबाची लांबी 16 ते 24 इंच असते. हा साप एका वेळी आपल्यापेक्षा चार पट मोठ्या प्राण्याला खाऊ शकतो. तसेच असं म्हणतात की हा साप एकाच वेळी तब्बल 100 लोकांना मारू शकतो.

इतर बातम्या :

मोठा बंगला, 20 एकरात फार्महाऊस पाहिजे, पुन्हा म्हणते मुलगा ढेकर देणारा नसावा, तरुणीच्या अपेक्षेने भलेभले चक्रावले

Video | लग्न समारंभात जेवणावर मस्तपैकी ताव, तरुण समोर दिसताच झाली नाजुका, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

Video | चार माणसांसोबत महिलेची ऑनलाईन बैठक, मध्येच झाला मोठ्ठा घोळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(know about most poisonous snake black mamba detail information in marathi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI