Video | लग्न समारंभात जेवणावर मस्तपैकी ताव, तरुण समोर दिसताच झाली नाजुका, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समोर तरुण पाहून एका तरुणीचे हावभाव कसे बदलतात, हे सांगण्यात आले आहे.

Video | लग्न समारंभात जेवणावर मस्तपैकी ताव, तरुण समोर दिसताच झाली नाजुका, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
MARRIAGE YOUNG GIRL VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. चर्चेत येण्यासाठी लोक रोज नवनव्या करामती करतात. त्यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ तयार करुन ते समाजमाध्यमांवर अपलोड करतात. त्यांच्या या व्हिडीओंना लोकांकडून मोठी पसंदी मिळते. याच पार्श्ववभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण पाहताच तरुणींचे हावभाव कसे बदलतात, हे सांगण्यात आले आहे. (young girl eating heavily in marriage video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका लग्नसमारंभातील आहे. या लग्नसोहळ्यात एक तरुणी जेवण करताना दिसत असून तिच्यासमोर  वेगवेगळे चविष्ट पदार्थ दिसत आहेत.  ती जेवणावर मस्तपैकी ताव मारत आहे. कशाचीही तमा न बाळगता ही तरुणी पोटभरून जेवण करत आहे.

तरुण येताच तरुणींचे हावभाव कसे बदलतात ?

मात्र, याच वेळी काही क्षणांत या तरुणीचे हावभाव ते जेवण्याची पद्धत असं सगळं काही बदललं आहे. ती अत्यंत नाजूकपणे जेवत आहे. तसेच जेवणाचा घाससुद्धा ती हळूवारपणे उचलत आहे. जेवण करताना समोर एखादा मुलगा दिसला की मुलीच्या जेवणात कसा बदल होतो, हे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. तरुण समोर उभा असेल तर मुलीचे हावभाव अचानकपणे बदलतात. तिच्या चालण्या-बोलण्यात सगळे बदल होतात. ती हळूवारपणे बोलते. नाजूक पद्धतीने जेवण करते, असे या व्हिडीओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, नेटकरी या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

वर्ल्ड क्यूटेस्ट बेबी, लाखोंनी चाहते असणारी गोड अनाहिता नेमकी आहे तरी कोण ?

Video | लहान मुलांची चिखलात धम्माल, व्हिडीओ पाहून आयपीएस ऑफिसरला आठवलं बालपण

Video | नदीच्या किनाऱ्यावर लोक थांबले, मध्येच जमीन खचली, पुढे काय झालं एकदा बघाच !

(young girl eating heavily in marriage video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI