Video | नदीच्या किनाऱ्यावर लोक थांबले, मध्येच जमीन खचली, पुढे काय झालं एकदा बघाच !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 25, 2021 | 3:50 PM

या व्हिडीओमध्ये एक थरारक घटना घडली असून एका माणसाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांना हसूसुद्धा आले आहे.

Video | नदीच्या किनाऱ्यावर लोक थांबले, मध्येच जमीन खचली, पुढे काय झालं एकदा बघाच !
river viral video
Follow us

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात. तर यातील काही व्हिडीओ आपल्याला थक्क करुन सोडतात. सध्या मात्र एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक थरारक घटना घडली असून एका माणसाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.  हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांना हसूसुद्धा आले आहे. (man fall down with land collapsed on the bank of river video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक दुर्घटना दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नदीला पूर आला आहे. हाच पूर पाहण्यासाठी नदीकिनारी काही लोक जमले आहेत. दहा ते बारा लोक नदीच्या बाजूने काहीतरी पाहत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

माणूस अचानकपणे नदीपात्रात पडला

मात्र, याचवेळी एक दुर्घटना घडली आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे नदीकिनाऱ्याची जमीन भुसभुशीत झाली आहे. याच कारणामुळे पाण्याचा जोरदार धक्का बसल्यामुळे किनाऱ्याची जमीन पाण्यात वाहून गेली आहे. जमीन वाहून गेल्यामुळे या घटनेत बाजूला उभा असलेला एक माणूस पाण्यामध्ये पडला आहे. तो नदीपात्रात पडल्याचे आपल्याला दिसते आहे. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून हा माणूस पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला नाही.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा प्रकार घडल्यानंतर बाकीचे लोक लगेच त्याच्या मदतीसाठी धावले आहेत. तसेच त्याला वाचवण्यासाठी बाजूच्या लोकांनी हात पुढे केला आहे. नदीत पडलेल्या माणसाला बाहेरच्या लोकांनी वाचवले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. सध्या हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | चार माणसांसोबत महिलेची ऑनलाईन बैठक, मध्येच झाला मोठ्ठा घोळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : जंगलात मस्ती करणारा हा छोटा हत्ती देतोय सामाजिक संदेश, व्हिडीओ पाहून नेटकरीही चकित

VIDEO : सिंहाला पाहिल्यावर मांजरेची शक्कल, मजेदार व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरुन हसाल!

(man fall down with land collapsed on the bank of river video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI