Video : जंगलात मस्ती करणारा हा छोटा हत्ती देतोय सामाजिक संदेश, व्हिडीओ पाहून नेटकरीही चकित

सोशल मीडिया म्हटलं की त्यावर जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडीओजचा नुसता भरणा असतो. पण या सर्व व्हिडीओंमध्ये प्राण्यांच्या व्हिडीओजना नेटकरी अधिक प्रमाणात पसंत करतात. त्यात कमी वयातील प्राणीतर अधिकच क्यूट दिसत असल्याने त्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. अशाच एका क्यूट हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये छोटा हत्ती एक सामाजिक संदेशही देत असल्याने नेटकरी या व्हिडीओला अधिक प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

Video : जंगलात मस्ती करणारा हा छोटा हत्ती देतोय सामाजिक संदेश, व्हिडीओ पाहून नेटकरीही चकित
baby elephant video

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपण सारेच पाहत असतो ते लाईक करुन शेअर करत असतो. काही व्हिडीओज तर सतत पाहावेसे वाटतात.  त्यात कमी वयातील प्राणीतर अधिकच क्यूट दिसत असल्याने त्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. अशाच एका क्यूट हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये छोटा हत्ती एक सामाजिक संदेशही देत असल्याने नेटकरी या व्हिडीओला अधिक प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

या व्हिडीओमध्ये एक छान अशी रंगबिरंगी शाल ओढलेलं हत्तीचं पिल्लू मस्त मजा करत जंगलात बागडतं आहे. एकटाच खेळणारं हे हत्तीचं पिल्लू खेळता खेळता रस्त्यात पडलेल्या झाडाच्या छोट्या फांद्याही सोंडेने उचलून बाजूला टाकत जणून स्वच्छतेचा सामाजिक संदेशच देत आहे. त्यामुळे या व्हिडीओला नेटकऱ्यांनी डोक्यावर उचलला असून सर्वत्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

व्हायरल होणारा हा व्हिडीओ Sheldrick Wildlife या अकाऊंटवरुन ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून लाईक केला आहे. विशेष म्हणजे अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत वेगवेळ्या रिएक्शन दिल्या आहेत. तसेच अनेकांचजण ‘या हत्तीप्रमाणे आपणही साफसाफाई ठेवायला हवी या हत्तीकडून सामाजिक संदेश घ्यायला हवा’ अशा कमेंट्सही करत आहेत.

इतर बातम्या :

Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा

(Baby Elephant Playing in Forest And giving Social Message of Cleanliness Went Viral on Social Media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI