Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा

प्राण्यांशी प्रेम केल्यावर समोरुनही प्रेमच मिळत. पण त्यांना त्रास दिल्यावर मात्र प्राणी तुम्हाला उलट त्रास देऊ शकतात. याचाच प्रत्यय या व्हायरल होत असेलेल्या व्हिडीओतून येतो.

Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा
Dog viral video (सौजन्य-इन्स्टाग्राम)
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 5:15 PM

मुंबई : काही राक्षसी वृत्तीच्या लोकांना गरीब मुक जनावरांना त्रास देण्यात आनंद मिळतो. असे विक्षिप्त लोक आपल्या आनंदासाठी प्राण्यांना त्रास देतात आणि त्याचे व्हिडीओही बनवतात. पण अनेकदा प्राणीही उलटवार करुन चांगलाच धडा शिकवतात. असाच एका कुत्र्याने अतिहुशारपणा करणाऱ्या मुलाला कसा धडा शिकवला हे दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच आवडेल.

या व्हिडीओमध्ये एक मुलगा कुत्र्याला ब्रेड चारत असतो. दोन ब्रेड चारल्यानंतर मजेसाठी तो मुलगा कुत्र्याचा कान ओढू पाहतो. ज्यामुळे अचानक कुत्र्याला राग अनावर होतो आणि कुत्रा चिडून मुलाचा हातच जबड्यात पकडतो. बरीच मेहनत करुन मुलाला आपला हात कुत्र्याच्या तावडीतून सोडवावा लागतो.

व्हिडीओला कॅप्शनही भन्नाट

व्हायरल होणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर haryanvi_chaskaa या पेजने शेअर केला आहे. सोबतच या व्हिडीओला, ‘हां भाई आ गया स्वाद’ असं कॅप्शन दिलं आहे. ज्याला मराठीत आपण ‘आता कसं वाटतय आली का मज्जा?’ असं उपहासात्मकपणे म्हणू शकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर केवळ शेअर केला जात नसून यावर अनेक कमेंट्सही नेटकरी करत आहेत. काहीजण अशाप्रकारे प्राण्यांना त्रास देणे चूकीचे आहे, अनेकदा ते असा पलटवारही करु शकतात. अशा कमेंट देखील करत आहेत.

इतर बातम्या :

Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ

(Viral Video Of Man teasing Dog and Dog Attacked man Viral Video Went Viral on Social Media)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.