Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

इंटरनेटवर दिवसाला अनेक नवे व्हिडीओ येत असतात. यात खासकरुन प्राणी आणि पक्षी यांचे व्हिडीओ बऱ्याच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. असाच एक सारस पक्षी आणि मगरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
crane and crocodile video
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 4:05 PM

मुंबई : सोशल मीडिया म्हटलं की त्यावर जगभरातल्या सर्व प्रकारच्या व्हिडीओजचा नुसता भरणा असतो. पण या सर्व व्हिडीओमध्ये प्राणी, पक्षी यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून अधिक प्रमाणात पसंती मिळते. हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केले जातात. काही व्हिडीओज इतके भारी असतात की, लोक त्यांना अगदी डोक्यावर घेऊन तुफान शेअर करतात. असाच एक सारस पक्षी आणि मगरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Video Of Brave Crane Rides on Crocodile Back Video Went Viral on Social media)

या व्हिडीओमध्ये एक निडर सारस पक्षी (Crane Bird) अगदी न घाबरता मगरीच्या (crocodile) पाठीवर बसून मस्तपणे पाण्यात सैर करत आहे. विशेष म्हणजे हा पक्षी बसला असलेल्या मगरीच्या आसपासही काही मगरी पोहताना दिसत असूनही अगदी न घाबरता हा सारस पक्षी मगरीच्या पाठीवरुन सैर करत आहे. मगरीचंही त्याच्याकडे विशेष लक्ष नसल्याने तिच्या पाठीवर पक्षी बसला आहे याचं तिला भान नसतं.

पुन्हा एकदा व्हायरल झाला व्हिडीओ

हा व्हिडीओ मागील वर्षी देखील इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात या व्हिडीओला लाईक आणि कमेंट करत आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअरही केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आणखी एक मगरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक मगर कुत्र्यावर हल्ला करताना दिसत होती. त्यानंतर आता आणखी एक मगरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ

(Video Of Brave Crane Rides on Crocodile Back Video Went Viral on Social media)

Non Stop LIVE Update
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.