Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येसुद्धा तरुणाच्या किरकोळ चुकीमुळे महामार्गावर गंभीर अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारे असतात. काही व्हिडीओंमध्ये किरकोळ चूक केल्यामुळे गंभीर अपघात घडल्याचे आपल्याला दिसते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येसुद्धा तरुणाच्या किरकोळ चुकीमुळे गंभीर अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (bike rider and car collision video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका अपघाताचा आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक कारमधून प्रवास करत आहेत. कारमध्ये बसून हे प्रवासी मस्तपैकी संगीत ऐकत आहेत. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे यातील एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे सुरु केले आहे. कारमधील माणूस समोर बरसत असलेला पाऊस आपल्या मोबाईलच्या माध्यमातून रेकॉर्ड करतो आहे.

वेगात दुचाकी चावलत कारला मागे टाकण्याचा प्रयत्न

मात्र, यावेळी कार चालवत असताना समोरुन एक दुचाकीस्वार येताना दिसतोय. त्याने हेल्मेट घातलेले असून तो दुचाकी वेगात चालवतो आहे. या तरुणाने त्याच्या समोर असलेल्या एका कारला मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावेळी व्हिडीओतील कार दुचाकीस्वाराच्या समोर आली आहे. यावेळी वेग जास्त असल्यामुळे हा तरुण दुचाकीचा तोल सांभाळू शकलेला नाही. परिणामी या तरुणाची दुचाकी घसरून थेट कारवर आदळली आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकरी तरुणावर भडकले

दुचाकी कारवर आदळल्यामुळे येथे गंभीर अपघात झाला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक दुचाकीस्वाराने एवढी घाई करण्याची आवश्यकता नव्हती, असे म्हणत आहेत. तर काही नेटकरी याच तरुणावर भडकले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला ‘jatt.life’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ

Video | अजगर पिल्लांवर चाल करुन आला, नंतर बिबट्याने जे केलं ते एकदा पाहाच !

Video | नवरी-नवरदेवाचा मोठा निर्णय, दोघांनीही केलं भर मंडपात टक्कल, कारण काय ?

(bike rider and car collision video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI