Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ

सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने कसलाही विचार न करता माकडांना शेकडो केळी खायला दिली आहेत.

Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ
monkey viral video


मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ पाहून आपल्याला मनातून आनंद होतो. काही व्हिडीओमंध्ये तर लोक असं काहीतरी करुन जातात ज्यामुळे आपण त्यांचे भरभरून अभिनंदन करतो. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने कसलाही विचार न करता माकडांना शेकडो केळी खायला दिली आहेत. (kind man giving banana to monkey video went viral on social media)

माणसू कारमधून आला

या व्हिडीओमध्ये एक माणसू दिसतो आहे. हा माणूस एका कारमध्ये आला आहे. कारमध्ये उतरुन माणूस नेमके काय करतो आहे, हे आपल्याला सुरुवातीला समजत नाही. मात्र, थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर हा माणूस नेमके काय करतोय हे आपल्याला समजते. माणसाने कार उभी करुन नंतर डिक्की उघडली आहे. त्याने डिक्कीतून केळ काढले आहेत.

माकडांनी केली माणसासमोर गर्दी

या माणसाने कार उभी करताच त्याच्या भोवती माकडांनी मोठी गर्दी केली आहे. या माणसाने कारमध्ये उतरुन आपल्या डिक्कीमधील केळी काढली आहे. कारमध्ये कित्येक डझन केळी असल्यामुळे माकडांनी माणसासमोर गर्दी केली आहे. व्हिडीओतील माणूस समोर असलेल्या माकडांना केळी वाटतोय. काही माकडांनी तर कारच्या डिक्कीमध्ये चढून हातानेच केळी घेतल्या आहेत. तर काही माकडे केळी घेऊन पळून जात आहेत. एवढं सारं होत असूनदेखील तो माणूस काहीही करत नाहीये. उलट तो माकडांना अत्यंत प्रेमाने केळी वाटतो आहे.

पाहा व्हिडीओ :

या माणसाची हीच कृती नेटकऱ्यांना आवडली आहे. नेटकऱ्यांनी या माणसाला भरभरून शुभेच्छा दिल्या असून त्याचे कौतूक केले आहे. आजच्या काळात प्राण्यांची काळजी घेणारा हा माणूस खरंच अत्यंत चांगला आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | अजगर पिल्लांवर चाल करुन आला, नंतर बिबट्याने जे केलं ते एकदा पाहाच !

Video | नवरी-नवरदेवाचा मोठा निर्णय, दोघांनीही केलं भर मंडपात टक्कल, कारण काय ?

Video | तरुणांनाही लाजवेल असा डान्स, आजोबांचे ठुमके एकदा पाहाच

(kind man giving banana to monkey video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI