Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

विचार करा तुम्ही जगंलातून जात आहात आणि मध्येच तुमच्या रस्त्यात जंगली जनावरं आली, तर तुमची काय हालत होईल? असंच काहीसं या व्हिडीओतील दुचाकीस्वारासोत झालं आहे.

Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं...
bear video

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपण सारेच पाहत असतो ते लाईक करुन शेअर करत असतो. काही व्हिडीओज तर सतत पाहावेसे वाटतात. पण काही प्राण्याचे व्हिडीओ हे मजेशीर नसून हैरान करणारे असतात. असाच काहीसा व्हिडीओ प्रसिद्ख उद्योगपती आनंद महिद्रां यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. एका दुचाकीस्वारासमोर जंगलातून जाताना समोर तीन अस्वलं आल्यावर त्याचं काय होतं हे दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडीओवर सतत कमेंट्स करत शेअर करत आहेत. (Bike Rider Encountering Bears in the Nilgiris Anand Mahindra shares Video Went Viral)

हा व्हिडीओ नीलगिरीच्या जंगलातील आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बाईकने जंगलातून जात असतो आणि अचानक त्याला काही अंतरावर तीन अस्वलं दिसतात. अस्वलांना पाहून तो आपली बाईक थांबवतो आणि तिन्ही अस्वलांना पाहत राहतो. त्याने राईड़ करताना कॅमेरा सुरु ठेवल्याने हे सर्व व्हिडीओत कैद होत असतं. तेवढ्यात तिघांतील एक अस्वल अचानक त्या व्यक्तीकडे पळत येऊ लागतं. त्यामुळे तो व्यक्ती प्रचंड घाबरतो आणि पळायला लागतो. पुढे काय होतं याचा विचार न करता सर्वांत आधी हा व्हिडीओ पाहा…

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला समजता की या व्यक्तीबरोबर काहीही अघटीत घडू शकलं असता. असंच काहीसं कॅप्शन देत आनंद महिद्रां यांनीही लिहिलं आहे की, ‘तुम्हाला रोमहर्षक व्हिडीओ पाहायचा असल्यास हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा. तसंच बाईकमध्ये ‘Bear Charge’ अशी वॉर्निंगही हवी अशी मेजशीर कॅप्शन दिली आहे. नेटकरी देखील या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरली अन् मध्येच मोठ्याने ओरडली, नेमके कारण काय ?

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ

(Bike Rider Encountering Bears in the Nilgiris Anand Mahindra shares Video Went Viral)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI