AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या उपमहापौरपदाचा मान शिंदेंच्या सेनेकडे! संजय घाडी यांची सव्वावर्षांसाठी निवड

मुंबईच्या उपमहापौरपदाचा मान शिंदेंच्या सेनेकडे! संजय घाडी यांची सव्वावर्षांसाठी निवड

| Updated on: Feb 07, 2026 | 11:20 AM
Share

शिवसेनेचे (शिंदे गट) संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असणार आहेत. महायुतीमधील समझोत्यानुसार भाजपचा महापौर तर शिंदे सेनेचा उपमहापौर असेल. उपमहापौर पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असेल, असे पक्षादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत. भाजपकडून महापौरपदाच्या उमेदवाराची लवकरच घोषणा अपेक्षित आहे.

मुंबई उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) संजय घाडी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महायुतीमधील समझोत्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर असेल, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला उपमहापौर पद मिळाले आहे. संजय घाडी यांचा उपमहापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असेल, असा एक नवीन फॉर्म्युला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

भाजपच्या मुंबई महानगर कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि गटनेते अमेय घोले यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षादेशाचे वाचन करून संजय घाडी यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मुंबईच्या विकासासाठी महायुतीला मिळालेले हे यश असल्याचे ते म्हणाले.

Published on: Feb 07, 2026 11:20 AM