मोठा बंगला, 20 एकरात फार्महाऊस पाहिजे, पुन्हा म्हणते मुलगा ढेकर देणारा नसावा, तरुणीच्या अपेक्षेने भलेभले चक्रावले

हा एका जाहिरातीचा फोटो असून तरुणीने आपला होणारा नवरा कसा असावा हे यामध्ये सांगितले आहे. तरुणीच्या अपेक्षा वाचून सगळेच चक्रावले आहेत.

मोठा बंगला, 20 एकरात फार्महाऊस पाहिजे, पुन्हा म्हणते मुलगा ढेकर देणारा नसावा, तरुणीच्या अपेक्षेने भलेभले चक्रावले
जाहिरातीचा फोटो

मुंबई : सोशल मीडियावरील वातावरण रोजच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तापलेले असते. या मंचावर रोजच वेगवेगळ्या विषयावर मजेदार आणि खरमरीत चर्चा होत असतात. कधी एखादा व्हिडीओ तर कधी एखादा फोटो पाहून नेटकरी मुक्तपणे व्यक्त होतात. याच पार्श्वभूमीवर सध्या एक फोटो चर्चेचा विषय ठरतोय. हा एका जाहिरातीचा फोटो असून तरुणीने आपला होणारा नवरा कसा असावा हे यामध्ये सांगितले आहे. तरुणीच्या अपेक्षा वाचून सगळेच चक्रावले आहेत. (young girl wants 20 acres farm house strange matrimonial ad became viral on social media)

मुलगी म्हणते मी स्त्रीवादी

या तरुणीने मुलगा कसा असावा हे सांगत मुलाकडून अजब अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या जाहिरातीमध्ये एका मुलीने स्वत:ला स्त्रीवादी असल्याचे सांगितले आहे.  मी भांडवलशाहीविरोधी असल्याचेही या तरुणीने जाहिरातीमध्ये सांगितले असून स्वत: सुशिक्षित असल्याचेही तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे शॉर्ट हेअर असल्याचे या तरुणीने जाहिरातीमध्ये सांगितलं आहे.

नवरा एकुलता एक आणि 20 एकरात फार्महाऊस असावे

या तरुणीने जाहिरातीमध्ये स्वत:विषयी माहिती दिल्यानंतर पुढे नवरदेव कसा असावा हे सांगितले आहे. तिच्या आपल्या होणाऱ्या भावी नवरदेवाविषयीच्या अपेक्षा वाचून सगळेच हैराण झाले आहेत. या तरुणीला आई-वडिलांना एकूलता एक असणारा मुलगा नवरा म्हणून हवा आहे. या तरुणाला एक बंगला असावा, अशीसुद्धा या तरुणीची अपेक्षा आहे. तसेच त्याचे 20 एकरामध्ये फार्महाऊससुद्धा असायला हवे, असे या तरुणीने जाहिरातीमध्ये सांगितले आहे. विशेष म्हणजे नवऱ्या मुलाला जेवण तयार करता यावे, अशी अटही या तरुणीने सांगितली आहे. यापेक्षाही अजब अट म्हणजे या तरुणीला ढेकर देणारा नवरा नको आहे.

जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये झळकल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच चा फोटोला विविध महिला तसेच तरुण मुलं रिट्विट करत आहेत. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video : महाकाय हिम अस्वलावर कुत्र्याचा हल्ला, व्हिडीओमध्ये पाहा कोण पडलं कोणावर भारी

Video | लग्न समारंभात जेवणावर मस्तपैकी ताव, तरुण समोर दिसताच झाली नाजुका, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

Video | लहान मुलांची चिखलात धम्माल, व्हिडीओ पाहून आयपीएस ऑफिसरला आठवलं बालपण

(young girl wants 20 acres farm house strange matrimonial ad became viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI