Lionel Messi Biri | प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचा बोलबाला, विडीच्या पॅकेटवर फोटो झळकल्याने धुमाकूळ

मेस्सी भारतामध्ये एका विडीच्या कव्हरवर झळकला आहे. विडीच्या या कव्हरचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Lionel Messi Biri | प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचा बोलबाला, विडीच्या पॅकेटवर फोटो झळकल्याने धुमाकूळ
messi biri viral photo

मुंबई : प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचे (Lionel Messi) जगभरात चाहते आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कृतीची बातमी होते. कोपा अमेरिका चषक जिंकल्यानंतर तर त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. मात्र, लिओनल मेस्सी सध्या दुसऱ्याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे.  (photo of lionel Messi on Biri packet went viral on social media)

लिओनल मेस्सी विडीच्या कव्हरवर झळकला

लिओनल मेस्सीची चर्चा ही जगभरात तर होतेच पण सध्या भारतात तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या मेस्सीचा बोलबाला सुरु आहे. कारण मेस्सी भारतामध्ये एका विडीच्या कव्हरवर झळकला आहे. विडीच्या या कव्हरचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक याला मेस्सी विडी म्हणत असून मजेदार कमेंट्स करत आहेत.

विडीवर मेस्सीचा फोटो

सविस्तर सांगायचं झालं तर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियाम येथे एक विडीचा कारखाना आहे. या कारखान्यात विड्यांचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावेळी या कारखान्यातून खास मेस्सी विडी तयार करण्यात आली आहे. या विडीच्या पॅकेटवर मेस्सी विडी असे लिहले असून त्यावर लिओनल मेस्सीचा फोटोदेखील लावण्यात आला आहे. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोक या मेस्सी विडीविषयी भरभरुन बोलत आहेत.

विडीचा फोटो पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंक्स

दरम्यान, सध्या व्हायरल होणारा फोटो हा आयपीएस रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. मेस्ची विडीचा हा फोटो पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. एका नेटकऱ्याने तर मेस्सीला भारतात ही पहिली जाहिरात मिळाली आहे, असे म्हटलेय. तर दुसऱ्या नेटकऱ्याने मेस्सीने कोपा अमेरिका चषक जिंकल्यामुळे त्याला भारतात लगेच जाहिरात मिळाली असे म्हटलेय. मेस्सी विडीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Sulak Canyon Video | 6 हजार फूट उंचावर महिला झोपाळ्यात बसल्या, अचानक साखळी तुटली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

Video | कंबरेला शेला बांधून काकांचे ठुमके, बहारदार डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडीओ पाहाच !

Video | पाण्याविना व्याकूळ झालेल्या उंटाला दिलं पाणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

(photo of lionel Messi on Biri packet went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI