Sulak Canyon Video | 6 हजार फूट उंचावर महिला झोपाळ्यात बसल्या, अचानक साखळी तुटली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

सध्या दोन महिलांसोबत असाच एक भीषण अपघात घडला आहे. सहा हजार फूट उंचावर दोन महिला झोका खेळत असताना हा झोका अचानकपणे तुटला आहे.

Sulak Canyon Video | 6 हजार फूट उंचावर महिला झोपाळ्यात बसल्या, अचानक साखळी तुटली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !
fall-off-swing


मुंबई : प्रत्येकालाच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं. याच आवडीपोटी लोक ट्रेकिंग, पर्वतारोहण करतात. मात्र, पर्यटनावेळी कधीकधी गंभीर घटना घडतात. सध्या दोन महिलांसोबत असाच एक भीषण अपघात घडला आहे. सहा हजार फूट उंचावर दोन महिला झोका खेळत असताना तो अचानकपणे तुटला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Two women fell off swing in Sulak Canyon video went viral on social media)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रुस देशातील दागिस्तान येथे घडली. येथे सहा हजार फूट उंच असलेल्या सुलक घाटीवर (Sulak Canyon) दोन महिला फिरायला आल्या होत्या. यावेळी या महिला घाटीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका झोक्यावर बसल्या होत्या. झोका खेळताना या दोन्ही महिला अतिशय आनंदी दिसत होत्या. मात्र, अचानकपणे झोक्याची साखळी तुटली आणि त्या झोक्यावरुन खाली कोसळल्या. नशीब बलवत्तर म्हणून या महिला खाली पर्वतांमध्ये गेल्या नाहीत. बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी या महिलांना वेळीच पकडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

पाहा व्हिडीओ :

झोके हटवण्याची नागरिकांकडून मागणी 

या महिलांसोबत घडलेल्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेमध्ये महिलांना थोडे खरचटले आहे. अपघाताचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर आल्यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या अपघातानंतर Sulak Canyon च्या काठावर बसवण्यात आलेले झोके हटवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

इतर बातम्या :

Video | कंबरेला शेला बांधून काकांचे ठुमके, बहारदार डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडीओ पाहाच !

Video | पाण्याविना व्याकूळ झालेल्या उंटाला दिलं पाणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Video | भर रस्त्यावर मृत्यूशी खेळ, तोंडात पेट्रोल टाकून आगीवर शिंपडण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

(Two womens fall off from swings in Sulak Canyon video went viral on social media)

(Two women fell off swing in Sulak Canyon video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI