Video | कंबरेला शेला बांधून काकांचे ठुमके, बहारदार डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडीओ पाहाच !

सध्या एका काकांच्या डान्सचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी काकांच्या डान्सचे दिवाने झाले आहेत.

Video | कंबरेला शेला बांधून काकांचे ठुमके, बहारदार डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडीओ पाहाच !
VIRAL DANCE VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओंची सगळीकडे विशेष चर्चा होते. लोकांनी शेअर केलेले डान्सचे व्हिडीओ तर नेटकरी आवडीने पाहतात. सध्या एका काकांच्या डान्सचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी काकांच्या डान्सचे दिवाने झाले आहेत. (bus driver funny dance on nagin tune video went viral on social media)

डान्सवेड्या काकांचे बहारदार ठुमके 

काही लोकांना डान्स करायला चांगलेच आवडते. डान्सदिवाने मिळेल तिथे डान्स करायला लागतात. जमेल त्या पद्धतीने डान्सवेडे त्यांची हौस भागवून घेतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ अशाच एका डान्सवेड्या काकांचा आहे. हे काका गाण्याची ताल ऐकून तिथेच थिरकायला लागले आहेत. कंबरेला शेला बांधून हे काका गाण्याच्या तालावर मजेदार ठुमके घेत आहेत. तसेच यावेळी डान्स करतानाचे त्यांचे हावभाव पाहण्यासारखे आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

या व्हिडीओमध्ये नागीन डान्सची धून आपल्याला ऐकायला येत आहे. याच धूनवर काका कंबरेवर हात ठेवून ठूमकत आहेत. तसेच एक हात वर करून डान्स करत करत ते गोलाकार फिरत आहेत. त्यांची डान्स करण्याची ही यूनिक पद्धत नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे. लॉकाडाऊनमध्ये काम नसल्यामुळे बस ड्रायव्हर हा डान्स करत असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. असे असले तरी हे काका कुठले आहेत ? काय करतात ? याबद्दल नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान, काकांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक त्यांच्या डान्सची वाहवा करत आहेत. एखाद्या महिला डान्सरला लाजवेल अशा पद्धतीने या काकांनी ठुमके घेतल्याचे नेटकरी म्हणत आहेत. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | पाण्याविना व्याकूळ झालेल्या उंटाला दिलं पाणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Video | भर रस्त्यावर मृत्यूशी खेळ, तोंडात पेट्रोल टाकून आगीवर शिंपडण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

लहानपणीच वडील गेले, हौसेने लग्न करताना बोनेटवर बसली, आता व्हिडीओ व्हायरल करु नका, वधूमाय रडवेली

(bus driver funny dance on nagin tune video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI