AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहानपणीच वडील गेले, हौसेने लग्न करताना बोनेटवर बसली, आता व्हिडीओ व्हायरल करु नका, वधूमाय रडवेली

"कोणालाही त्रास द्यायचा आमचा उद्देश नव्हता. उत्साहात तो व्हिडीओ शूट केला, मात्र आता व्हायरल करु नका" अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा यांनी केली.

लहानपणीच वडील गेले, हौसेने लग्न करताना बोनेटवर बसली, आता व्हिडीओ व्हायरल करु नका, वधूमाय रडवेली
बोनेटवर बसून लग्नाला निघालेल्या वधूचा व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 4:08 PM
Share

पुणे : स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून लग्नाला जाताना व्हिडीओ काढल्याने नववधूवर गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका” अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा करत आहेत. 23 वर्षीय वधूसह कारचालक, व्हिडीओग्राफर आणि गाडीतील इतर वऱ्हाड्यांवर पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बोनेटवर बसून लग्नाला निघालेल्या वधूचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

वधूची आई काय म्हणाली?

“तिच्या वडिलांचे 2004 मध्येच निधन झाले. तेव्हा ती जेमतेम सहा वर्षांची होती. आईने मोठ्या कष्टाने तिला मोठे केले. तिचे नुकतेच सासवडमध्ये लग्न झाले. आनंदाच्या भरात गाडीच्या बोनेटवर बसून तिने व्हिडीओ शूट केला. अल्पावधीतच तो व्हिडीओ व्हायरल झाला, अगदी बातम्याही झळकल्या. मात्र पोलिस स्थानकात गुन्हाही दाखल झाला. मुलीच्या लग्नाच्या आनंदात केलेला हा व्हिडीओ डोकेदुखी ठरेल, असं आम्हा कुटुंबियांना वाटलंही नाही. कोणालाही त्रास द्यायचा आमचा उद्देश नव्हता. उत्साहात तो व्हिडीओ शूट केला, मात्र आता व्हायरल करु नका” अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा यांनी केली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (13 जुलै) तरुणीचा विवाह सासवड (ता. पुरंदर) परिसरातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. लग्नासाठी जाताना उत्साहाच्या भरात ती दिवे घाटातून चक्क कारच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास करत होती. या विषयी माहिती मिळताच पोलिस सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास तिथे पोहोचले. त्यावेळी नववधू कारच्या बोनेटवर बसली होती. तर इतर वऱ्हाडी गाडीत बसले होते.

पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येत होते. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचा कॅमेरा जप्त केला. नववधू, व्हिडीओग्राफर तसेच गाडीतील इतरांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या 

Viral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल

VIDEO | स्कॉर्पिओच्या बॉनेटवर बसून लग्नाला निघाली, पुण्यात नववधूसह वऱ्हाडींवर गुन्हा

(Pune Bride sits on Scorpio car bonnet for her Wedding mother appeals not to viral video after daughter gets booked)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.