Viral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल

लग्नांचे अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता वधू-वरांनी असं काही केलं की हे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. (The bride swags in front of the Groom while eating Panipuri, watch this video)

Viral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 21, 2021 | 11:08 AM

मुंबई : लग्नांचे अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ खळखळून हसवणारे असतात, तर काही पाहून आश्चर्य वाटतं. तर असेही काही व्हिडीओ आहेत ज्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये नववधूनं नवरदेवाबरोबर गंमत केली, हा व्हिडीओ पाहून लोक प्रचंड हसत आहेत.

व्हिडीओ बघून तुम्ही हसत राहाल…

आपल्या सर्वांना हे माहित आहे की लग्नात नववधू आणि नवरदेव हे सर्वात आकर्षणाचे केंद्र असतात. पण, आता वधू-वरांनी असं काही केलं की हे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. कधीकधी जोडपे अशी कृती करतात, जी लोकांना बघायला मिळतेच. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधूनेही असेच काहीतरी केलं आहे. हे पाहिल्यानंतर, तुम्ही हसत राहाल.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर एका पाणीपुरीच्या स्टॉलसमोर उभे आहेत. दोघांनाही पाणी पुरीचा आनंद घ्यायचा आहे मात्र वधूला आपला दिवस संस्मरणीय बनवायचा आहे. ज्यासाठी ती वराबरोबर मजा करू लागते, ती आधी पाणीपुरी घेते आणि वराला देण्याचा प्रयत्न करते, मात्र गंमत म्हणजे ती पाणीपुरी स्वतःच खाते. या दोघांचा हा गमतीशीर व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरतोय.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूपच पसंत केला जातोय. यामुळेच अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने म्हटलं की हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे ज्यामुळे मी याच्या प्रेमात पडलोय. दुसर्‍या वापरकर्त्यानं लिहिलं की यावर्षी मी पाहिलेली ही उत्तम गोष्ट आहे, अद्भुत !. या व्यतिरिक्त इतर बर्‍याच लोकांनी या व्हिडीओचं वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केलंय. trending_wedding_couples या नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा मजेदार व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

संबंधित बातम्या

Indian Idol 12 Shocking Elimination : सवाई भट्टवर प्रेक्षक नाराज? कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर!  

Lookalike : दिशा पटानी सारखीच हॉट आहे ही स्पॅनिश अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये देतात एकमेकींना टक्कर

Khatron Ke Khiladi 11 : अभिनव शुक्लाची शोमधून एक्झिट? टॉप 4 मध्येही स्थान मिळवता आलं नाही…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें