Khatron Ke Khiladi 11 : अभिनव शुक्लाची शोमधून एक्झिट? टॉप 4 मध्येही स्थान मिळवता आलं नाही…

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार अभिनव शुक्लानं शोमध्ये पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवलं होतं. आता मात्र अभिनव टॉप 4 मध्ये स्थान मिळवू शकला नसल्याची बातमी समोर येत आहे. (Abhinav Shukla's exit from the show? Couldn't even get a place in the top 4.)

Khatron Ke Khiladi 11 : अभिनव शुक्लाची शोमधून एक्झिट? टॉप 4 मध्येही स्थान मिळवता आलं नाही…

मुंबई : खतरों के खिलाडी 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअॅलिटी शोच्या सीझन 11 ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सध्या या शोचे शूटिंग केपटाऊनमध्ये सुरू आहे. अनेक टीव्ही सेलेब्स शोमध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार निक्की तांबोळी शोमधून बाहेर पडली आहे. तर आहे या यादीमध्ये आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. बिग बॉस 14 फेम अभिनव शुक्ला यांनाही हा शो सोडावा लागला आहे.

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार अभिनव शुक्लानं शोमध्ये पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवलं होतं. आता मात्र अभिनव टॉप 4 मध्ये स्थान मिळवू शकला नसल्याची बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकल्यानंतर अभिनवचे चाहते दु:खी झाले आहेत.

अभिनवचं शोमधून बाहेर पडण्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अभिनेता एकदम फिट आहे आणि तोच हा शो जिंकणार असा कयास मांडला जात होता. काही दिवसांपूर्वी अभिनव भयंकर स्टंट करत होता, मात्र अद्याप त्याचा निकाल कोणालाही कळू शकलेला नाही.

टॉप 4 मध्ये स्थान मिळू शकलं नाही

रिपोर्ट्सनुसार अभिनव शोमधून बाहेर पडल्यानंतर राहुल वैद्य, दिव्यांका त्रिपाठी, वरुण सूद आणि अर्जुन बिजलानी यांनी टॉप 4 मध्ये स्थान मिळवले आहे.

निक्की तांबोळी मुंबईत परतली

निक्की तांबोळी केपटाऊनहून मुंबईला परतली आहे. ती नेहा कक्करचा भाऊ टोनीसह नंबर लिख या गाण्याचं प्रमोशन करताना दिसली. सोशल मीडियावर या गाण्याचं प्रमोशन करताना तिनं व्हिडीओही शेअर केला आहे.

नवीन प्रोमो व्हायरल

नुकतंच चॅनेलनं एक नवीन प्रोमो शेअर केला आहे ज्यात अर्जुन बिजलानी विद्युत शॉकमुळे रडकलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन इलेक्ट्रिक टॉवरवर स्टंट करताना दिसत आहे. अशावेळी चुकीच्या वायरला स्पर्श केल्यामुळे अर्जुन इलेक्ट्रोक्युट झाला. व्हिडीओ शेअर करताना, चॅनेलनं लिहिलं – डेअरडेव्हिल बनण्याच्या मार्गावर आहेत इलेक्ट्रिक शॉक. खतरों के खिलाडी घेऊन येत आहे अमर्याद भय आणि करमणूक. लवकरच…

या शोमध्ये राहुल वैद्य, अभिनव शुक्ला, दिव्यांका त्रिपाठी, अनुष्का सेन, श्वेता तिवारी, सना मकबूल, निक्की तांबोळी, विशाल राज सिंग, आस्था गिल, सौरभ राज जैन, मेहक चहल आणि वरुण सूद अर्जुनसोबत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

Photo: ‘हे’ बॉलिवूड कलाकार अजूनही राहतात भाड्याच्या घरात, वाचा सविस्तर

Nusrat Jahan : प्रेग्नन्सीच्या बातमीदरम्यान नुसरत जहांनं शेअर केले खास फोटो, फ्लॉन्ट करतेय बेबी बंप!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI