Photo: ‘हे’ बॉलिवूड कलाकार अजूनही राहतात भाड्याच्या घरात, वाचा सविस्तर

असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे अजूनही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात.(Bollywood actors still live in rented houses, read more)

1/5
Bollywood Stars
एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री बॉलिवूडमध्ये चांगले चित्रपट करत असेल तर त्यांचं मुंबईत मोठं घर असेल असं लोकांना वाटतं. मात्र तुमचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असे काही अभिनेते आणि अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत जे अजूनही मुंबईत रेंटच्या घरात राहतात.
2/5
Hritik Roshan
बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशननं अनेक संपत्तींमध्ये गुंतवणूक केली आहे. यानंतरही तो जुहूमधील रेंटच्या अपार्टमेंटमध्ये राहतोय. तो अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या बंगल्याच्या अगदी जवळ राहतो. तो जवळपास एक वर्षापासून तिथं राहत आहे आणि एका वेबसाइट नुसार दरमहा तो 8.25 लाख रुपये भाडे म्हणून देतो.
3/5
Bollywood Stars
श्रीलंकेचं सौंदर्य आणि माजी मिस युनिव्हर्स श्रीलंका जॅकलिन फर्नांडिज सी-फेसला पाच बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहते. एका वेबसाइटच्या मते, जॅकलिन सध्या दरमहा 6.78 लाख रुपये भाडं देत आहे.
4/5
Katrina Kaif
कतरिना कैफनं शोबीजच्या जगात पाऊल ठेवलं आहे त्या दिवसापासून तिच्याकडे घर नाही. कार्टर रोडवरील सिल्व्हर सँड्स अपार्टमेंटमध्ये राहण्यापासून वांद्रे येथील भाड्यानं घेतलेल्या पेंटहाऊसपर्यंत कतरिना कैफ नेहमीच रेंटवर राहतेय. एका वेबसाइटनुसार कतरिना कैफ दरमहा 15 लाख रुपये भाडे देते.
5/5
Pariniti Chopra
परिणीतीनं आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात 'लेडीज VS रिकी बहल' या चित्रपटाद्वारे केली होती. परिणीती अजूनही तिच्या स्वप्नातील घर शोधत आहे. ती अजूनही मुंबईतील 2 बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI