Video : मेस्सी आणि नेयमार यांच्यातील भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद, कोपा अमेरिका फायनलनंतर दोघेही झाले भावूक

कोपा अमेरिका चषक 2021 फायनलचा सामना जगातील अव्वल क्रमाकांचे खेळाडू मेस्सी आणि नेयमार यांच्या अर्जेंटीना विरुद्ध ब्राझील संघात रंगला होता. चुरशीच्या या सामन्यांचा निर्णय अर्जेंटीनाकडून लागला पण निर्णयानंतर दोन्ही खेळाडूंचे मैदानातील प्रेम पाहून सर्वचजण भावूक झाले.

Video : मेस्सी आणि नेयमार यांच्यातील भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद, कोपा अमेरिका फायनलनंतर दोघेही झाले भावूक
नेयमार आणि मेस्सी एकमेकांना मिठी मारताना

रिओ : कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) जिंकतच मेस्सीने आपल्या एका कृतीने सर्वांची मनंही जिंकली. कोपाच्या अंतिम सामन्यात अनेक वर्षांपासून कोपा अमेरिका स्पर्धा गाजवणारे अर्जेंटीना आणि ब्राझील हे संघ आमने-सामने होते. त्यात दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू ही फुटबॉल जगतातील बेस्ट खेळाडू लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि नेयमार (Neymar) मैदानावर आमने-सामने असल्याने स्पर्धा चूरशीची होणार होती हे नक्की. अखेर चुरशीच्या सामन्यात अर्जेंटीनाने एका गोलच्या फरकाने विजय मिळवला. पण अवघ्या एका गोलच्याच फरकाने नेयमारचा संघही पराभूत झाल्याने नेयमार कमालीचा निराश झाला होता. मैदानातच रडणाऱ्या नेयमारला अनेकजण सावरत होते. त्याचवेळी त्याचा मित्र जो आज प्रतिस्पर्धी होता त्या मेस्सीनेच मिठी मारत नेयमारला सावरले काही वेळ एकमेकांना हग करणाऱ्या या खेळाडूंचा हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सर्वत्र सध्या व्हायरल होत आहे.

मेस्सीचा शर्टलेस डान्सही व्हायरल

सामन्यानंतर मेस्सी आणि संघाने मैदानावर मोठा धिंगाणा केला. सर्वांनी मेस्सीला अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यानंतर संपूर्ण अर्जेंटीना संघ ड्रेसिंग रुममध्ये जाऊन जल्लोष करु लागला. यावेळी मेस्सीने चक्क टी-शर्ट काढून ट्रॉफीसोबत डान्स केला. त्याचा हा डान्स सध्या व्हायरल होत असून चाहतेही या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

चुरशीच्या सामन्यात अर्जेंटीना विजयी

नेमार आणि मेस्सी सोडता दोन्ही संघाकडे उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा होता. ज्यात ब्राझीलकडे थियागो सिल्वा, फ्रेड, कॅसमिरोसारखे खेळाडू होते. तर अर्जेंटीनाकडे मेस्सीसह डी मारीया, पॅरडेज, लुईस मार्टीनेजसारखे तगडे खेळाडू होते. त्यामुळे या सामन्याकडे सर्वच फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून होते. सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा सुरू होता. दोन्ही संघ एकमेकांना तोडीस तो़ खेळ करत होते. अखेर २२ व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या एंजल डी. मारिया (Angel DI maria) याने  पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ब्राझीलला एकही गोल करता न आल्याने अखेर सामना 1-0 च्या फरकाने अर्जेंटीनाने जिंकत स्पर्धाही आपल्या नावे केली.

हे ही वाचा :

Copa America Final Winner : विजयानंतर अर्जेंटीना संघाचा जल्लोष, मेस्सीला अश्रू अनावर, पाहा फोटो

Copa America Final Winner : अर्जेंटीना संघाचा ब्राझीलवर रोमहर्षक विजय, मेस्सीच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच संघाला मोठा मान

Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल

(Argentina FC Won Copa America against Brazil in FInal With 1-0 score Messi and Neymar Hugged Eachother and got Emotional)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI