AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्जन डॉक्टर, प्रचंड सुंदर असूनही स्थळ मिळेना !, मुले करताहेत नापसंद, काय कारण ?

जास्मिन आपल्या व्हिडिओत पुढे म्हणते की माझ्यासाठी माझे घरचे योग्य जोडीदार शोधत आहेत. त्यांच्या कुटुंबाला मी आवडते. माझे प्रोफेशन पसंद असते. मग तरीही ते मला नकार देतात...

सर्जन डॉक्टर, प्रचंड सुंदर असूनही स्थळ मिळेना !, मुले करताहेत नापसंद, काय कारण ?
trending story
| Updated on: Oct 01, 2026 | 10:18 PM
Share

जर एखादी तरुणी पेशाने डॉक्टर असेल आणि दिसायला देखील सुंदर असेल तरीही तिला स्थळं येत नसतील आणि तिचे लग्न ठरत नसेल तर याला काय म्हणावे. एक सर्जन असूनही जॅस्मीन हीचे लग्न काही केल्या ठरत नाहीए. या संदर्भात सोशल मीडियावर तिने आपली खंत मांडली आहे. ती म्हणते तिची घरची मंडळी तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत. स्थळ पाहायला येणाऱ्या लोकांना कुटुंबाला आमचे कुटुंब आवडते. माझे प्रोफेशन देखील आवडते. माझ्या बोलण्याचा राहाण्याचा अंदाजही आवडतो. सर्वकाही पसंद पडते. परंतू एक गोष्ट कळताच हे लोक मला नकार देतात असे जस्मीन हीने म्हटले आहे.

एक रुपवान तरुणी चांगली डॉक्टर असूनही तिचे लग्न ठरत नाहीए, याला काय म्हणाल. सर्जन जॅस्मीन कालसी ही इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन आपले दु:ख मांडले आहे. ती म्हणते की प्रसिद्ध होणे काय पाप आहे का ? जॅस्मीन म्हणते मला २ लाख फॉओअर्स असूनही लग्नासाठी एक लायक मुलगा मिळत नाहीए. जॅस्मीनचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध असल्याने मिळतोय नकार…

जॅस्मीन हीने सांगितले की जेव्हा मुलांकडची मंडळी माझे फोटो माझ्या पालकांकडे मागतात तेव्हा ते त्यांना एकदा इंस्टाग्रामवर डॉ. जैस्मीन कालसी नावाने सर्च करा असा सल्ला देतात. त्यानंतर त्या मुलाच्या नातेवाईकांचे उत्तर येते की तुमची मुलगी तर खूप प्रसिद्ध आहे. आमच्याकडे ती अडजस्ट करु शकणार नाही. जॅस्मीनच्या मते त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता पाहून त्यांना रिजेक्ट केले जाते.

काय कंटेंट टाकते जॅस्मीन ?

जॅस्मीनच्या मते जास्त फॉलोअर्स असण्याचा अर्थ सेलिब्रिटी होणे नसते. त्या म्हणाल्या की माझा रिच इंस्टाग्रामचा आहे, औकातचा नाही. जॅस्मीनच्या अनुभवाने लग्नात महिलांचे करियर आणि सोशल मीडियावरील उपस्थिती संदर्भात चर्चा सुरु झाली आहे. पेशाने सर्जन असलेली आणि कंटेन्ट क्रिएटर जॅस्मीन मेडिकल एज्युकेशन आणि रुग्णांना जागरुक करणारे व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. ती म्हणते माझी इंस्टाग्राम पोस्ट पाहा मी कोणी सेलिब्रिटी नाही केवळ एक डॉक्टर आहे. जिच्या रिल्स काही लोक पहातात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना