Video: अभिषेक माझा आहे, तू त्याला बाबू का म्हणाली…; Bfसाठी मुलीला मारहाण, पाय पकडून माफी मागितली तरीही…

Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी दुसऱ्या मुलीला बॉयफ्रेंडवरुन मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तरुणीने रस्त्यावरुन जाणाऱ्यांकडे मदत मागितली. पण कोणीही थांबले नाही.

Video: अभिषेक माझा आहे, तू त्याला बाबू का म्हणाली…; Bfसाठी मुलीला मारहाण, पाय पकडून माफी मागितली तरीही...
Kanpur Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 30, 2025 | 1:40 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी दुसऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडवरुन भर रस्त्यात मारताना दिसत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. पण एका मुलीने ज्या प्रकारे दुसऱ्या मुलीला मारले आहे ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. हे भांडण एका मुलावरुन सुरु असल्याचे नंतर समोर आले. आता नेमंक काय घडलं चला जाणून घेऊया…

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील यशोदा नगर बायपासवर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे. एका मुलीने दुसऱ्या मुलीला वाईट रीतीने मारले. या मारहाणीचा एक मिनिटाचा व्हिडीओ आज समोर आला. व्हिडीओमध्ये पांढरे कपडे घातलेली एक मुलगी दुसऱ्या तरुणीचे केस ओढताना, रस्त्यावर ओढताना आणि कानाखाली मारताना दिसत आहे. तर तिसऱ्या मुलीने याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली एकच युवक अभिषेकला घेऊन एकमेकांशी भिडल्या. मारणारी मुलगी व्हिडीओत ओरडत म्हणत आहे, अभिषेकला तू सोडले होते. आता जेव्हा तो माझा झाला, तेव्हा तू त्याला बाबू का म्हणतेस. म्हणशील का? सांग त्याला बाबू म्हणशील का?

पीडित मुलगी पाय पकडून माफी मागत राहिली, पण आक्रमक मुलीने तिला मारणे सुरूच ठेवले. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की पांढरे कपडे घातलेल्या मुलीने पीडितेचे केस पकडून रस्त्यावर आपटले आणि नंतर ११ वेळा कानाखाली मारल्या. त्यानंतर तिने पीडितेच्या छातीवर आणि डोक्यावर लाथा-बुक्यांनी मारले. तिसऱ्या मुलीने, जी व्हिडीओ बनवत होती, तिनेही पीडितेला लाथ मारली.

तीसऱ्या मुलीनेही केली मारहाण

व्हिडीओच्या सुरुवातीला मारणारी मुलगी पीडितेला म्हणते, अभिषेकला तू म्हणत होतीस, मी तुला यापूर्वी कुठे तरी भेटले आहे. स्काय लॉनमध्ये भेटले आहे. जेव्हा पीडित मुलगी उत्तर देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आक्रमकाने तिच्या छातीवर लाथ मारली, ज्यामुळे ती रस्त्यावर कोसळली. पीडित मुलीने ओरडून रस्त्यावरून जाणाऱ्यांकडे मदत मागितली, पण कोणीही पुढे आले नाही. आजूबाजूचे लोक तमाशा बघत राहिले, ज्यामुळे घटनेची गांभीर्यता आणखी वाढली. सांगितले जात आहे की मारहाण करणाऱ्या दोन्ही मुली बर्रा परिसरातील राहणाऱ्या आहेत.

दोन्ही बाजूंच्या संपर्कात पोलीस

कानपूरमध्ये अलीकडच्या महिन्यांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे छोट्या-मोठ्या वादातून रस्त्यावर मारहाण झाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. त्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओ आमच्या लक्षात आला आहे. प्रकरणाची चौकशी केली जात आहे. हे प्रकरण लव्ह ट्रँगलशी संबंधित वाटते आहे. आम्ही दोन्ही बाजूंच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरच योग्य कारवाई केली जाईल. पीडित मुलीची ओळख सार्वजनिक केलेली नाही.