पुतीन यांच्या घरावर हल्ला होताच…नरेंद्र मोदी यांचं मोठं पाऊल, थेट…मोठी अपडेट समोर!
व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Russia Ukraine War : गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते युक्रेनचे प्रमुख वोलोडीमीर झेलेन्स्की तसेच रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत बैठका घेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या काही बैठकांमुळे हे युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते, असे सांगितले जात आहे. परंतु युद्ध संपण्याची शक्यता बळावताच युक्रेनने पुतीन यांच्या निवासस्थानालाच लक्ष्य केले आहे. थेट पुतीन यांच्या घरावरच ड्रोन हल्ले करण्यात आल्यामुळे आता शांतीची चर्च फिस्कटली असून युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात या युद्धाचे काय होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.
पुतीन यांच्या घरावर मोठा हल्ला
पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर आता रशिया चांगलाच संतापला आहे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा पवित्रा रशियाने घेतला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया मंचावर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पुतीन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक पातळीवर चर्चा करणे हाच योग्य मार्ग आहे, असेही मोदी म्हणाले आहेत. हा प्रश्न चर्चेतून सोडवण्यावरच दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहनही मोदी यांनी रशिया आणि युक्रेनला केले आहे.
Deeply concerned by reports of the targeting of the residence of the President of the Russian Federation. Ongoing diplomatic efforts offer the most viable path toward ending hostilities and achieving peace. We urge all concerned to remain focused on these efforts and to avoid any…
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2025
रशियाने नेमकी काय भूमिका घेतली?
पुतीन यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर रशियान प्रतिक्रिया दिली आहे. रविवार आणि सोमवारी रात्री हा हल्ला झाला. त्यानंतर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गोई लाव्हरोव्ह यांनी एका माध्यमाशी बोलताना आम्ही सर्व ड्रोन्सना पडले. तसेच आमचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच आता आम्हाला या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. आता युक्रेनसोबतच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या चर्चेत आम्ही भूमिका बदलणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. सोबतच आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत युद्ध थांबवण्यासाठी चर्चादेखील चालूच ठेवू, असेही रशियाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
