Ahemadabad Plane Crash : गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर रडणाऱ्या सागरला दु:खावेग आवरेना, म्हणाला – कल रहेंगे या…

एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाच्या भीषण अपघातात 270 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबई मॉडेल सागर पाटील याचा भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात तो आपल्या प्रेयसीच्या मृत्यूनंतर रडताना दिसला. त्याने नंतर सोशल मीडियावर पोस्ट करून आपली भावना व्यक्त केली आणि जीवनाचा अर्थ सांगितला.

Ahemadabad Plane Crash : गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर रडणाऱ्या सागरला दु:खावेग आवरेना, म्हणाला - कल रहेंगे या...
sagar patil post
| Updated on: Jun 19, 2025 | 1:44 PM

Sagar Patil Post : अहमदाबाद हून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गेल्या आठवड्यात भीषण अपघात झाला. त्यामध्ये विमान प्रवाशांसह ते विमान ज्या परिसरात कोसळलं त्या मेडिकल कॉलेजमधील अनेकांचाही मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांचा हा आकडा 270 च्या वर पोहोचला असून मृतांच्या कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरलेला नाही. या दुर्घटनेत अनेकांचे कुटुंब संपलं, अनेकांनी मुलगा, आई-वडील, तर कुणी भाऊ, कुणी प्रियकर-प्रेयसी गमावले. याचदरम्यान मुंबईतील मॉडेल असलेल्या सागर पाटील याचाही एक व्हिडीओ समोर आला होता. तो अहमदाबादच्या एका रुग्णालयात चुपचाप बसून रडताना दिसला होता. त्याचे अश्रू , विलाप पाहून अनेकांचे डोले पाणावले. पाहता पाहता त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला.

तू कोणाची वाट पाहत आहेस असं त्याला नंतर विचारण्यात आलं असता त्याने रडत रडतंच सांगितलं – माझं प्रेम… सागरचा तो फोटो आता एक भावनिक क्षण बनला आहे आणि लोक तो विसरू शकत नाहीत. या अपघातानंतर सागर पाटील मुंबईहून अहमदाबादला पोहोचला आणि त्याचं प्रेम, त्याची प्रेयसी वाचली असेल अशी त्याला आशा होती. मात्र अखेर त्याच्यासमोर प्रेयसीच्या मृत्यूची बातमी आली आणि तो दु:खाने कोलमडून पडला.

सागरने केली इमोशनल पोस्ट

अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक आठवडा उलटला असून आता सोशल मीडियावर सागरची एक पोस्ट समोर आली आहे, त्या स्टोरीत त्याने बरंच काही लिहीत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. “तुमच्या सर्वांच्या सहानुभूती आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. इतके डीएम आले आहेत की मी सर्वांना उत्तर देऊ शकत नाही. जे काही चाललं आहे त्याची पोकळी भरून काढण्यासाठी काय बोलावं हेच मला कळत नाहीये ” असं सागरने लिहीलं आहे.

 

“तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, त्यांच्यावर प्रेम करा, आनंदी रहा. उद्या आपण इथे असू की नाही हे माहित नाही.” सागरच्या या पोस्टमध्ये त्याचे दुःख आणि असहाय्यता स्पष्टपणे दिसून येते. सागरला हे दुःख सहन करण्याची शक्ति मिळो, अशीच प्रार्थना सर्व नेटीजन्स करत आहेत.

272 जणांचा मृत्यू

गेल्या गुरूवारी, अर्थात 12 जून 2025 रोजी दुपारी झालेल्या या विमान दुर्घटनेने लोकांना मुळापासून हादरवून टाकलं आहे. या विमानातील पायलट, क्रू मेंबर्स, प्रवासी तसेच विमान ज्या परिसरात कोसळलं तेथील स्थानिकांसह 272 लोकांचा मृत्यू झाला. या काळ्या दिवसाच्या आठवणी मृतांच्या कुटुंबियांना किती काळ छळत राहतील, ते या दुःखातून कधी बाहेर पडू शकतील, हे तर येणारा काळच ठरवेल. परंतु हा 2025 सालचा जगातील सर्वात वाईट अपघात होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला.