Video: कुसू कुसू गाण्यावर तरुणीचा भन्नाट बेली डान्स पाहून नेटकरी घायाळ, डान्स व्हिडीओ प्रचंड Viral

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव सोनाली केंटुरा असे आहे. सोनाली नोरा फतेहीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या कुसु कुसू या गाण्यावर जबरदस्त मूव्ह करताना दिसत आहे. तिच्या उत्कृष्ट बेली डान्सिंग टॅलेंटने सोशल मीडिया युजर्सना मंत्रमुग्ध केले आहे.

Video: कुसू कुसू गाण्यावर तरुणीचा भन्नाट बेली डान्स पाहून नेटकरी घायाळ, डान्स व्हिडीओ प्रचंड Viral
कुसू कुसू गाण्यावर मुलीचा भन्नाट डान्स

नृत्याच्या अनेक शैली आणि प्रकार आहेत, त्यापैकीच एक बेली डान्स, जो लोकांना खूप आवडतो, कारण तो लोकांना खूप आकर्षित करतो. जरी प्रत्येक व्यक्तीला नृत्य करणे आवडत असलं तरी ते करणे तितकेच कठीण आहे. बेली डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर फारसे पाहिले जात नाहीत, पण जेव्हा एखादा व्हिडिओ समोर येतो, तेव्हा लोक प्रत्येक प्लॅटफॉर्मवर शेअर करायला विसरत नाहीत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उत्तराखंडमधील एक मुलगी जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव सोनाली केंटुरा असे आहे. सोनाली नोरा फतेहीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या कुसु कुसू या गाण्यावर जबरदस्त मूव्ह करताना दिसत आहे. तिच्या उत्कृष्ट बेली डान्सिंग टॅलेंटने सोशल मीडिया युजर्सना मंत्रमुग्ध केले आहे. तिच्या नृत्यादरम्यान तिने सोनेरी रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

हा व्हिडिओ पाहा

लोकांना तिचा डान्स तर आवडतोच आहे, पण तिचे एक्स्प्रेशनही आवडत आहे. त्यामुळेच अनेकजण हा व्हिडीओही एकमेकांना शेअर करतात. प्रचंड व्हायरल होत असलेल्या या डान्स व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खूप सुंदर सादरीकरण, सुंदर डान्स परफॉर्मन्स, तुम्हाला लवकरच यश मिळेल.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘तुम्ही केलेला डान्स खरोखरच कौतुकास्पद, स्वच्छ आणि सुंदर आहे. मनापासून धन्यवाद. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

तुमच्या माहितीसाठी, हा व्हायरल व्हिडिओ 28 नोव्हेंबर रोजी Instagram प्लॅटफॉर्मवर sonali_kaintura_official नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता आणि ही बातमी लिहिपर्यंत तो 80 ते हजार वेळा पाहिला गेला आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी सोनालीने तिच्या इंस्टाग्रामवर ‘कुडी नशे सी चड गई’ गाण्यावर बेली डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. सोनाली इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे आणि तिच्या फॉलोअर्सची संख्या 3 लाखांच्या जवळपास आहे. तिच्या इन्स्टा पोस्टवर, सोनालीने स्वतःला डेहराडूनच्या विकासनगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे.

हेही पाहा:

Video: अस्वल लाडात आलं, मालकामागे गाडी शिरण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर जे झालं, त्याचा चांगलाच भुर्दंड!

Video: ‘आँख उठी मोहोब्बत’ आफ्रिकेतल्या भावाचं भन्नाट लिपसिंक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, आजपासून आम्ही याचे फॅन झालो!

 

Published On - 11:29 am, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI