Video: ‘आँख उठी मोहोब्बत’ आफ्रिकेतल्या भावाचं भन्नाट लिपसिंक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, आजपासून आम्ही याचे फॅन झालो!

नवीन व्हिडिओमध्ये हे आफ्रिकन भाऊ आणि बहिण 'आँख उठी मोहोब्बत' गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहेत. मात्र, हे गाण्याचं मेल व्हर्जन असल्याने त्यातील भाऊच लिपसिंक करत आहे. तर त्याची बहीण त्याला मागून साथ देत आहे.

Video: 'आँख उठी मोहोब्बत' आफ्रिकेतल्या भावाचं भन्नाट लिपसिंक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, आजपासून आम्ही याचे फॅन झालो!
बॉलीवूड गाण्यावर आफ्रिकन भाऊ-बहिणीचं लिपसिंक

एखाद्याला जगात प्रसिद्ध व्हायचे असेल, तर त्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग आहे. असे अनेक लोक आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर कुठली ना कुठली कला करून जगभर आपलं नाव उंचावण्याचा प्रयत्न करतात. त्यात एका आफ्रिकन भाऊ बहिणाचाही समावेश झाला आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आफ्रिकेत राहणारे एक भाऊ आणि बहीण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॉलीवूडच्या ‘शेरशाह’ मधील ‘राता लांबिया’ गाणे लिप सिंक करत जगभर प्रसिद्ध झाले होते. आता त्याचा एक नवीन व्हिडिओही आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की बॉलिवूड कलाकारही त्या आफ्रिकन भाऊ-बहिणीचे चाहते झाले आहेत.

नवीन व्हिडिओमध्ये हे आफ्रिकन भाऊ आणि बहिण ‘आँख उठी मोहोब्बत’ गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहेत. मात्र, हे गाण्याचं मेल व्हर्जन असल्याने त्यातील भाऊच लिपसिंक करत आहे. तर त्याची बहीण त्याला मागून साथ देत आहे. विशेष म्हणजे या मुलाचे लिपिंग तर चांगले आहेच, पण त्याची स्टाइलही जबरदस्त आहे. यामुळेच लोक त्याची गाणी खूप पसंत करत आहेत.

व्हायरल व्हिडीओ:

या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून या आफ्रिकन भावा-बहिणीचे कौतुक केले आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘तो खूप क्यूट आहे, त्याचे स्माईल बघा’. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने ‘याला सौंदर्य म्हणतात’ असे लिहिले आहे.

हा व्हिडिओ बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हे आफ्रिकन भाऊ-बहिणी ज्या गाण्यावर ‘आँख उठी मोहोब्बत’ सादर करत आहेत ते इमरान हाश्मीच्या ‘मुंबई सागा’ चित्रपटातील गाणं आहे. या गाण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे गाणे देखील जुबिन नौटियालने गायले आहे. व्हायरल झालेल्या या आफ्रिकन भाऊ आणि बहिणीचा पहिला व्हिडिओ देखील जुबिन नौटियालने गायला होता. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला असून, ‘संगीत सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे’, असे लिहिले आहे.

हेही पाहा:

Video: देव करो आणि हा व्हिडीओ खोटा ठरो, बर्थ डे बंम्पज देताना ‘तो’ गुदरमला, हादरवणारा व्हिडीओ

Viral: लहान मुलांचा हा व्हिडीओ तुम्हाला भावनिक केल्याशिवाय राहणार नाही, पाहा व्हिडीओ

 

Published On - 9:00 am, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI