AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: लहान मुलांचा हा व्हिडीओ तुम्हाला भावनिक केल्याशिवाय राहणार नाही, पाहा व्हिडीओ

मुलं हे देवाचं रूप असतात, ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये मुलांचा निरागसपणा नक्कीच दिसला असेल. त्याचा स्वभाव लोकांची मने जिंकतो.

Viral: लहान मुलांचा हा व्हिडीओ तुम्हाला भावनिक केल्याशिवाय राहणार नाही, पाहा व्हिडीओ
चिमुरड्यांचा भावनिक व्हिडीओ
| Edited By: VN | Updated on: Nov 30, 2021 | 3:45 PM
Share

सोशल मीडियावर जसे हसवणारे व्हिडीओ पाहायला मिळतात, तसेच भावनिक करणारे व्हिडीओही चांगलेच व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. ज्यामध्ये रस्त्यावर कृत्रिम दागिने विकणाऱ्या दोन चिमुरड्यांना एका अनोळखी व्यक्तीकडून एक क्यूट सरप्राईज मिळते. यावर दोन्ही मुलांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल. या व्हिडिओ क्लिपला 83 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स हादरले आहेत. व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर आला आहे.

मुलं हे देवाचं रूप असतात, ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये मुलांचा निरागसपणा नक्कीच दिसला असेल. त्याचा स्वभाव लोकांची मने जिंकतो. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुले रस्त्यावर टोपल्यांमध्ये कृत्रिम दागिने विकताना दिसत आहेत. त्याच्या गळ्यात प्लास्टिकची टोपली लटकलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ब्लॉगर मुलांना चॉकलेट देत आहे. यावर मुलांच्या चेहऱ्यावर तरंगणारे हसू तुमचा दिवस उजाडण्यासाठी पुरेसे आहे.

 चला हा व्हिडिओ पाहूया.

View this post on Instagram

A post shared by @thecheeseaddict_2193

हा भावनिक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर thecheeseaddict_2193 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यापूर्वी कधीही इतके चांगले वाटले नव्हते. मी तुम्हालाही काहीतरी चांगले करण्याचे आवाहन करतो. रोज काहीतरी चांगलं करा, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणा.” 10 नोव्हेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाख 36 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

हा व्हिडिओ पाहून सगळेच भावूक होत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘लहान मुलांच्या चेहऱ्यावरील गोंडस हास्य पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले.’ तुम्ही खूप छान काम करत आहात. अनाथांना अशीच मदत करत राहा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणत राहा.

हेही पाहा:

स्टंट करण्याच्या नादात तोंडावर आपटला, व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले, पाहा धक्कादायक Video

Video: ज्या बेबी ट्रॉली लोकांना बाळ आहे असं वाटत होतं, ते काही वेगळंच निघालं, प्रँक व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

 

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!